नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनीही आता या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे. फटाक्यांची ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे दिल्ली पोलिस प्रवक्ते मधुर वर्मा यांनी सांगितले.
यावर्षी दिवाळीच्या काळात दिल्ली-एनसीआर विभागात एक नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली गेली आहे. न्यायालयाच्या या आदेशाने फटाकेच्या व्यवसायिकांना मोठा धक्का बसला आहे.
फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी हटविण्याचा गेल्या महिन्याचा आगेश १ नोव्हेबंरपासून लागू होणार आहे. फटाक्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांचे लायसन्स रद्द करण्यात येत आहेत.
१२ सप्टेंबरच्या आदेशानुसार तत्काळ लायसन्स रद्द करण्याच्या आदेशावर पुनर्विचार व्हायला हवा असे न्यायमूर्ती ए.के. सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील एका खंडपीठाने सांगितले. लोक दिवाळीच्या दिवशी फटाके विकत घेता येणार नाहीत ही पहिलीच वेळ असेल असेही त्यांनी सांगितले. दिल्ली-एनसीआर विभागात फटाक्यांच्या मोठ्या आणि किरकोळ विक्रीवर बंदी आणण्याच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टाचे आदेश असले तरी, फटाक्याच्या व्यवसायात मंदी आल्याचे निदर्शनास आणले गेले.
"यावर्षी दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या विक्रीवर होणारा अडथळा हा उद्योजकांना पोटावर लाथ मारण्यासारखा असल्याचे'' दिल्ली फायरक्रॅकर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन यांनी सांगितले.
१२ सप्टेंबरला फटाक्यांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी उठल्यानंतर आम्हाला विश्वास होता की ऑक्टोबरच्या दिवाळीच्या दिवशी आमच्या परवान्यांची नूतनीकरण केली जाईल. परंतु आज न्यायालयाने (तात्पुरते विक्रीवर) १ नोव्हेंबरपासून प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठीच्या निर्देशांमुळे लाखोंच्या बेरोजगारीचे संकट आले आहे. देशाच्या राजधानीत सुमारे पाच लाख लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे क्रॅकर व्यवसायाशी जोडले गेले आहेत हे लक्षात घ्यायला हवे.