सरकारी कार्यालयामध्ये येत विधवा महिलेवर नराधमाने... वेदनेने विव्हळत राहिली पाडिता!

Rajastan Crime News : बारी सर्कल परिसरात 12 सप्टेंबर रोजी आरोपी एका सरकारी नोकरीत (Govt Job) असलेल्या एका विधवासोबत कार्यालयात होता अन्...

Updated: Nov 2, 2022, 01:40 AM IST
सरकारी कार्यालयामध्ये येत विधवा महिलेवर नराधमाने... वेदनेने विव्हळत राहिली पाडिता! title=

Crime News : राजस्थानच्या (Rajastan) धौलपूर जिल्ह्यातील बारी भागात सरकारी कार्यालयातून धक्कादायक घटना घडली आहे. 12 सप्टेंबर रोजी ही घडल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या विधवा महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. बारी भागाचे पोलिस अधिकारी मनीष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत आरोपी तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली.

नेमकं काय झालं?

बारी सर्कल परिसरात 12 सप्टेंबर रोजी आरोपी एका सरकारी नोकरीत (Govt Job) असलेल्या एका विधवासोबत कार्यालयात होता. कार्यालयात आलेला आरोपीने आपल्यात सहकारी महिलेवर आत्याचार केला. बलात्कारानंतर महिलेने पोलिसांना सांगितल्यास किंवा इतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती.

अशा स्थितीत घाबरलेल्या महिलेने 4 दिवस घटना दडपून ठेवली. मात्र नंतर ते सहन न झाल्यानं त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. त्यावर महिलेने बारी सर्कल ऑफिसर मनीष कुमार शर्मा यांच्यासमोर एफआयआर (FIR) सादर केलाय.

आणखी वाचा - जेव्हा माकड बिअर मारतं 'टॉप टू बॉटम', बेवड्या माकडाचा Video तुफान व्हायरल!

दरम्यान,  या प्रकरणाची (Rajastan Crime News) तातडीने दखल घेत पोलिसांनी महिलेचे मेडिकल करून तपास सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी अटकेसाठी छापेमारी केली. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी माहिती देणाऱ्याच्या माहितीवरून संबंधित गाव परिसरातून अटक केली, त्याला न्यायालयात हजर करण्यात आलंय.