Shraddha Walker Case : आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

श्रद्धा हत्या (shraddha walker case) प्रकणात नवीन माहिती समोर आली आहे. पुन्हा भाईंदरची खाडी? आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न  

Updated: Nov 28, 2022, 12:33 PM IST
Shraddha Walker Case : आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?  title=

Shraddha Walker Case :  श्रद्धा हत्या (shraddha walker case) प्रकणात नवीन माहिती समोर आली आहे. श्रद्धाची हत्या करणा-या आफताबने पुरावे नष्ट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. श्रद्धाचा मोबाईल हा सर्वात मोठा पुरावा ठरू शकला असता.. पण तोच मोबाईल आफताबने नष्ट केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रद्धाच्या मोबाईलमध्ये आफताबचा एक व्हिडिओ होता.. श्रद्धाला हाच व्हिडिओ वाचवू शकला असता असा दावा श्रद्धाचा मित्र गॉडवीन याने केलाय. (aaftab poonawala-shraddha walker)

श्रद्धाच्या मोबाईलमधीला हा व्हिडीओ कोणाच्या तावडीत सापडू नये म्हणून आफताबने मोबाईलमधला सर्व डेटा डिलीट मारल्याचा संशय पोलिसांना आहे. शिवाय मोबाईलमधला सर्व डेटा डिलीट मारल्यानंतर आफताबने फॅक्टरी रिसेट मारल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ( delhi shraddha case)

वाचा | Shraddha Walker Murder Case : पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबकडून दिशाभूल; 5 पुराव्यांपैकी 'एक' गोष्ट मिळणं कठीण!

 

एवढंच नाहीतर, श्रद्धाचं सीमकार्डही आफताबनं नष्ट केलं. 20 ते 23 ऑक्टोबरदरम्यान भाईंदरच्या खाडीत त्याने हा मोबाईल फेकल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. या तारखांदरम्यान श्रद्धाचा फोन अॅक्टिव्ह होता.. ( delhi shraddha case)

आफताबला माणिकपूर पोलिसांनी 23 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतरच आपण पकडले जाऊ या भीतीने आफताबने श्रद्धाचा मोबाईल नष्ट केल्याचं पोलिसांनी म्हटलं. भाईंदरच्या खाडीत मनसुख हिरेन यांची गाडी आढळली होती. शिवाय त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीतून पोलिसांना मिळाला होता. 

सोमवारी आफताबला ड्रग्स देणाऱ्या तस्कर पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, फैझल मोमीन नावाच्या अमली पदार्थ तस्कराला सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे. फैझल हा वसईचा रहिवासी आहे. पोलिसांना संशय आहे की, फैझल आफताब राहत असलेल्या परिसरात सतत येत होता. एवढंच नाहीतर, फैझल आफताबला ड्रग्जही पुरवत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.