PAN - Aadhaar 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही? आता पॅन कसे सक्रिय होईल, कसं ते जाणून घ्या

 PAN-Aadhaar linking: तुमचा पॅन आणि आधार लिंक नसले तरीही आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य आहे. परंतु जोपर्यंत दोन्ही लिंक होत नाहीत तोपर्यंत आयटी-विभाग तुमच्या पूर्ण प्रक्रिया करणार नाही. पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

Updated: Jul 4, 2023, 12:39 PM IST
PAN - Aadhaar 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही? आता पॅन कसे सक्रिय होईल, कसं ते जाणून घ्या title=

PAN-Aadhaar linking: लिंक करण्याची शेवटीच मुदत 30 जून 2023 होती. मात्र, ज्यांचे पॅन आणि आधार 1 जुलैपूर्वी लिंक होऊ शकले नाही, त्यांचे पॅन निष्क्रिय झाले असेल. आता तुम्हाला दंड भरल्यानंतर ते सक्रिय करु शकता. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) पोर्टलवर लॉग ऑन करा आणि चलन क्रमांक ITNS 280 अंतर्गत मेजर हेड 0021 (Income Tax Other than Companies) आणि मायनर हेड 500  (Other Receipts) सह रक्कम भरावी लागणार आहे.

तुमचा पॅन आणि आधार लिंक नसले तरीही आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य आहे. परंतु जोपर्यंत दोन्ही लिंक होत नाहीत तोपर्यंत आयटी-विभाग तुमच्या पूर्ण प्रक्रिया करणार नाही. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 होती. या तारखेपर्यंत ज्या करदात्यांनी या दोघांना लिंक केले नाही ते आयकराशी संबंधित काही सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. 1 जुलै 2023 पासून, आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झालेल्यांसाठी पॅन निष्क्रिय होईल. या लोकांचा TDS  (tax deducted at source) आणि TCS (tax collected at source) जास्त दराने कापला जाईल. प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅन धारक जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत त्यांनी त्यांचा पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

अशा प्रकारे पॅन सक्रिय करता येईल

1000 रुपयांचा दंड भरल्यानंतर, करदाता त्याचा पॅन सक्रिय करु शकतो. ही प्रक्रिया नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) पोर्टलवर चलन क्रमांक ITNS 280 अंतर्गत मेजर हेड 0021 आणि मायनर हेड 500 (इतर पावत्या) सह भरुन केली जाऊ शकते.

लिंक केल्याशिवाय आयटीआरवर प्रक्रिया केली जाणार नाही PAN ला बायोमेट्रिक आधारशी लिंक केल्याशिवाय आयकर रिटर्न (ITR) भरणे शक्य असले तरी, जोपर्यंत दोन्ही लिंक होत नाहीत. तोपर्यंत आयकर विभाग आयटीआरवर प्रक्रिया करणार नाही. शुक्रवारी, प्राप्तिकर विभागाने सांगितले की, ज्या प्रकरणांमध्ये पॅन कार्ड आधारशी जोडले जाऊ शकत नाही अशा प्रकरणांचा विचार केला जाईल आणि व्यक्तींनी संमती दिली आहे आणि शुल्क भरावे लागणार आहे.

एका ट्विटमध्ये, प्राप्तिकर विभागाने म्हटले होते की, पॅन धारकांना आधार-पॅन लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्या आहेत. विभागाकडून सांगण्यात आले,  या संदर्भात, अशी माहिती देण्यात आली आहे की लॉग इन केल्यानंतर पोर्टलच्या 'ई-पे टॅक्स' टॅबमध्ये चलन भरण्याची स्थिती तपासली जाऊ शकते. पेमेंट यशस्वी झाल्यास, पॅन धारक आधारशी पॅन लिंक करण्यासाठी पुढे जाऊ शकतो.