Aadhaar Card Free Update: तुम्हीही आत्तापर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करणे चुकवले असेल, तर सरकारने तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आपली मोफत आधार अपडेट योजना 14 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या पावलेचा फायदा लाखो आधार क्रमांक धारकांना होणार आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची पहिली तारीख 14 सप्टेंबर 2024 होती. मात्र, आता ही सेवा १४ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून, त्यानंतर 'मायआधार' पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
यूआयडीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. यूआयडीआय (UIDIA) लाखो आधार धारकांना यांचा लाभ घेता यावा म्हणून 14 डिसेंबर २०२४ पर्यंत मोफत ऑनलाइन डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही सेवा निःशुल्क मायआधार पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. UIDAI लोकांना यासाठी प्रोत्साहित केलं आहे.
UIDAI लोकांना त्यांच्या आधारमध्ये सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. ज्यांनी त्यांचे आधार कार्ड एका दशकापेक्षा जास्त काळ अपडेट केलेले नाही त्यांनी ते आता करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक वैयक्तिक बायोमेट्रिक्सशी जोडलेला आहे आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी हे ओळखपत्र आहे. लोकांना 10 वर्षांतून एकदा तरी आधार कार्डमधील कागदपत्रे अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आणि पासबुक यांसारख्या कागदपत्रांद्वारे 'माय आधार' पोर्टलवर कोणतीही व्यक्ती आपले तपशील अपडेट करू शकते. ही कागदपत्रे 'MyAadhaar' पोर्टलवर किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर सबमिट केली जाऊ शकतात. ऑनलाइन सबमिशन केल्यावर, व्यक्तीने त्याच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर मिळालेला वन-टाइम पासवर्ड वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे.
अनिवासी भारतीय (एनआरआय) देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असे UIDAI ने म्हटले आहे. अनिवासी भारतीय जेव्हा ते भारतात असतील तेव्हा ऑनलाइन पद्धतीने किंवा आधार केंद्राला भेट देऊन कागदपत्रे सबमिट करू शकतात. UIDAI च्या म्हणण्यानुसार, नवजात बाळाला "आई-वडिलांचा जन्म प्रमाणपत्र आणि आधार क्रमांक देऊन" आधारसाठी नोंदणी केली जाऊ शकते. परंतु, त्यांचे आधार बायोमेट्रिक 5 ते 15 वर्षांच्या दरम्यान अपडेट केले जावे.