Aadhaar: तुम्ही अजून मुलांचे आधार कार्ड बनवले नाही, मग जाणून घ्या त्याचे महत्त्व

Baal Aadhaar:  देशात हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यूआयडीएआय (भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण) ने पालकांना नवजात मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलांचं आधार कार्ड अजून तुम्ही काढलं नसेल तर ही माहिती जाणून घ्या.   

Updated: Oct 15, 2022, 04:16 PM IST
Aadhaar: तुम्ही अजून मुलांचे आधार कार्ड बनवले नाही, मग जाणून घ्या त्याचे महत्त्व title=
aadhaar card for children and Baal Aadhaar nmp

Aadhaar Card For Children:  आधारकार्डविषयी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं आहे तर आधी ही बातमी वाचा. देशामध्ये आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदापत्रापैकी एक आहे. सरकारकडून आधार कार्ड (Aadhaar Card) हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जात असल्याने आज प्रत्येकाकडे आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे आधार कार्डमध्ये व्यक्तीची बायोमेट्रिक (Biometric Information) माहिती डिजिटल स्वरुपात साठवली जाते. त्यामुळे देशात हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यूआयडीएआय (भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण) ने पालकांना नवजात मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलांचं आधार कार्ड अजून तुम्ही काढलं नसेल तर ही माहिती जाणून घ्या. 

इथे बनवू शकता आधार कार्ड

देशातील अनेक रुग्णालयांमध्ये बाळाचा जन्म (birth of a baby) होताच आधार कार्ड बनवण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या मुलाचं आधार कार्ड तुमच्या जवळच्या आधार केंद्रात किंवा अंगणवाडीत बनवून घेऊ शकता. मुलाचं आधार मिळविण्यासाठी, तुम्हाला आधार नोंदणी फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला मुलाशी संबंधित आवश्यक तपशील प्रविष्ट करावं लागतील. फॉर्मसोबत तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रतीही जोडावी लागतील. (aadhaar card for children and Baal Aadhaar nmp )

असे मिळेल आधार कार्ड

फॉर्म भरल्यानंतर काउंटरवर बसलेल्या कर्मचाऱ्याला फॉर्म द्या. त्यानंतर कर्मचारी तुमच्या मुलाच्या आधार कार्डसाठी नावनोंदणीची प्रक्रिया सुरू करतील. त्यानंतर आधार कर्मचारी तुमच्या मुलाचं नाव, वडिलांचं नाव, घराचा पत्ता, जन्मतारीख, लिंग इत्यादी माहिती घेऊन त्याचं छायाचित्र घेतलं जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल. ही स्लिप सांभाळून ठेवा कारण तुम्ही तुमचं आधार कार्ड त्यावर लिहिलेल्या नावनोंदणी क्रमांकासह ऑनलाइन स्थिती तपासून डाउनलोड करू शकता.

बाल आधारसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

मुलाचं आधार कार्ड काढण्यासाठी कोणत्याही विशेष कागदपत्राची आवश्यकता नाही. पण मुलाचं आधार बनवण्यासाठी त्याचा जन्म प्रमाणपत्र (birth certificate) किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज पेपर आवश्यक आहे. यासोबतच मुलाच्या पालकांपैकी एकाचं आधार कार्ड देखील आवश्यक आहे. 5 वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डला बाल आधार (Baal Aadhaar) असं म्हणतात आणि ते फिकट निळ्या रंगाचं असतं. त्यामुळे नुकताच जन्मलेल्या मुलांचं आधार कार्ड आताच काढून घ्या.