संसार म्हटलं तर त्यात भांडणं, वाद असतातच. हे वाद कधीकधी इतक्या टोकाला पोहोचतात की, घटस्फोटाचे निर्णय घेतले जातात. यामागे विरोधी स्वभाव, मतं, आर्थिक वाद अशा अनेक गोष्टी असतात. यातील आणखी एक कारण म्हणजे विवाहबाह्य संबंध असतं. दरम्यान, पतीच्या याच विवाहबाह्य संबंधांवरुन एका पत्नीने पतीला चक्क चपलेने मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही महिला थेट पतीच्या ऑफिसमध्येच पोहोचली होती. यानंतर काही कळण्याआधी पत्नीने पतीवर चपलांचा पाऊस सुरु केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिहारच्या औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. पती इंजिनिअर असून नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात बसून काम करत होता. याचदरम्यान, एक महिला कार्यालयात दाखल होते आणि त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडते. महिला जेव्हा चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारहाण करु लागते तेव्हा कार्यालयातील सगळेच आश्चर्याने पाहत उभे राहतात. सुरुवातीला इतर कोणालाच ही महिला कोण आहे? आणि ती मारहाण का करत आहे? हे कळत नाही. पण नंतर ही महिला अधिकाऱ्याची पत्नी असल्याचं सर्वांना समजतं. महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीचं त्यांच्या कार्यालयातील महिला अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध आहेत.
महिलेचा पती कार्यकारी अभियंता म्हणून काम करतो. व्हिडीओत महिला पतीच्या कार्यालयात शिरल्यानंतर त्याला चपलीने मारहाण करण्यास सुरुवात करते. यादरम्यान पती मारहाणीपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. पण पत्नी अजिबात शांत होण्यास तयार नसते. पती तिच्यापासून बचाव करत बाहेर पळत गेला असता, पत्नी तिथेही त्याचा पाठलाग करते. रस्त्यावर गेल्यानंतरही महिला पतीला मारहाण करत राहते. यादरम्यान, ती पती आपल्याला आर्थिक मदत पुरवत नसल्याचा आरोप करते.
महिला पतीला मारहाण करत असताना तिथे लोकांची गर्दी जमा होते. मारहाण केल्यानंतर महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना यामागील कारण सांगितलं. ती म्हणाली की "आपण गेल्या एक वर्षापासून माहेरी आई-वडिलांकडे राहत आहोत. पण आपला पती ना आपल्याला आर्थिक मदत करत आहे, ना आपल्या मुलांना कोणती मदत देत आहे". पैसा मिळत नसल्याने मुलांना चांगलं शिक्षण मिळत नसल्याचं महिलेने म्हटलं आहे.
महिलेने म्हटलं आहे की, आपला पती सर्व पैसा विवाहबाह्य संबंधावर खर्च करत आहे. यामुळे मला आणि मुलांना कोणतंही आर्थिक सहाय्य मिळत नाही आहे. या जोडप्याची मुलगीही आईसह पोहोचली होती. तिनेही वडिलांवर आरोप केले आहेत. वडिलांचे विवाहबाह्य संबंध केले असून, गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.