रात्री 12 वाजता घरी आलेल्या पत्नीला जाब विचारणं पतीला पडलं महागात; तोंड लपवत गाठावं लागलं पोलीस स्थानक

रात्री उशिरा घऱी आल्याचं कारण विचारल्याने पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.   

Updated: Jan 30, 2023, 03:38 PM IST
रात्री 12 वाजता घरी आलेल्या पत्नीला जाब विचारणं पतीला पडलं महागात; तोंड लपवत गाठावं लागलं पोलीस स्थानक title=

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर जिल्ह्यात पतीने रात्री उशिरा घरी आल्याचं कारण विचारल्याने पत्नीने पतीवर अॅसिड फेकल्याची (Acid Attack) धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पतीचा चेहरा भाजला आहे. पतीने त्याच अवस्थेत पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगंजमध्ये ही घटना घडली आहे. रात्री 12 वाजता घरी आल्याने पतीने पत्नीला उशिरा येण्याचं कारण विचारलं. यानंतर पत्नी संतापली आणि तिने पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. पत्नी इतक्यावरच थांबवली नाही, तर पतीला बेदम मारहाणदेखील केली. यानंतर जळालेला चेहरा घेऊन पतीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. दरम्यान जखमी पतीवर पोलीस ठाण्यात उपचार सुरु आहेत. 

डब्बू गुप्ता असं पीडित पतीचं नाव आहे. शनिवारी मध्यरात्री ३ वाजता त्याने पोलीस स्टेशन गाठलं असता चेहरा जळालेला होता. डब्बूने पोलिसांना सांगितलं की, पत्नी पूनम रात्री 12.30 च्या जवळपास घऱी आली होती. आपण तिला इतक्या रात्री कुठे गेली होतीस अशी विचारणा केली. यावर ती संतापली आणि आपल्यावर ओरडू लागली. यानंतर तिने आपल्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वत:ला वाचवण्यासाठी आपणही हात उचलला. यानंतर पत्नीने बाथरुममध्ये ठेवण्यात आलेली अॅसिडची बाटली उचलली आणि चेहऱ्यावर फेकलं. 

मदतीसाठी गाठलं पोलीस स्टेशन

अॅसिड हल्ल्यानंतर डब्बू वेदनेने विव्हळत होता. त्याच स्थितीने त्याने पोलीस स्टेश गाठलं आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर कलेक्टर गंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पत्नीला बेड्या ठोकल्या.