मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्फोटानंतर हवेत उडालेला ट्रकचा टायर अंगावर घेतला, पण...; मृत्यूचा LIVE व्हिडीओ

तामिळनाडूच्या सेमल येथील एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. गॅरेजमध्ये टायर स्फोट होऊन उंच हवेत उडाला. यानंतर तो एका व्यक्तीवर कोसळला, ज्याचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 18, 2023, 11:41 AM IST
मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्फोटानंतर हवेत उडालेला ट्रकचा टायर अंगावर घेतला, पण...; मृत्यूचा LIVE व्हिडीओ title=

मृत्यू हा अटळ आहे. फक्त तो कधी आणि केव्हा होईल याची आपल्याला काहीच माहिती नसते. त्यामुळे जेव्हा वेळ आलेली असते, तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी मृत्यू टाळता येत नाही. याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या सेलम येथे ही घटना घडली असून, टायर अंगावर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ज्याप्रकारे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ते पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, ही व्यक्ती आपल्या मित्रांसह गॅरेजमध्ये उभी होती. यावेळी मेकॅनिक तिथेच बाजूला टायर दुरुस्त करत होता. पण त्यावेळी अचानक एक मोठा स्फोट होता. या स्फोटासह ट्रकचा भलामोठा टायर उंच हवेत उडतो. यानंतर मेकॅनिकला वाचवण्यासाठी दोघे त्याच्या दिशेने धाव घेतता. पण त्याचा जीव वाचवताना आपण स्वत: मृत्यूकडे धावत असल्याची त्याला कल्पनाच नसते. कारण हवेत उडालेला टायर त्यांच्यातील एकाच्या अंगावर येऊन कोसळतो. यामुळे त्याचा जागीच मृत्यू होतो. 

गॅरेजजवळ असणाऱ्या सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेड्डीपल्लम येथील मोहनसुंदरम नावाचा तरुण आपल्या मित्रांसह टायर पंक्चरचं दुकान चालवतो. सोमवारी तो ट्रकच्या टायरचं पंक्चर काढत होता. त्याचवेळी जोरदार स्फोट होऊन टायर उंच हवेत उडतो. 

स्फोटानंतर काही वेळासाठी तिथे धूर झाला होता. दरम्यान स्फोट झाला तेव्हा मोहनसुंदरमचे दोन सहकारी तिथेच उभे होते. स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर ते मोहनसुंदरमच्या दिशेने धावतात. पण त्यावेळी हवेत उडालेला टायर मोहनसुंदरमचा सहकारी राजकुमार याच्या अंगावर येऊन कोसळतो. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तर दुसरा सहकारी जखमी झाला आहे. 

यानंतर दोघांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी राजकुमारला मृत घोषित केलं. तर दुसऱ्या सहकाऱ्यावर उपचार सुरु आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.