"मुख्याध्यापक गळ्यात हात टाकायचे अन् नंतर विद्यार्थ्यांसमोरच....," शिक्षिकेने शिक्षक अधिकाऱ्यासमोर मांडली व्यथा

Crime News: मथुरा (Mathura) येथे एका मुख्याधपकाला शिक्षेकेसह असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आली आहे. आपण विरोध केला असता शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 8, 2023, 02:57 PM IST
"मुख्याध्यापक गळ्यात हात टाकायचे अन् नंतर विद्यार्थ्यांसमोरच....," शिक्षिकेने शिक्षक अधिकाऱ्यासमोर मांडली व्यथा title=

Crime News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरा (Mathura) येथील अपर प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्याध्यापक करतार सिंगने शाळेतील शिक्षिकेसोबत असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा महिला शिक्षिकेने विरोध केला तेव्हा मुख्याध्यापकाने तिला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. अनेक दिवसांपासून शिक्षेकेवर अत्याचार सुरु होते. 

मुख्याध्यापकाचे अत्याचार वाढू लागल्यानंतर अखेर शिक्षिकेने शिक्षण अधिकाऱ्याकडे याची तक्रार केली. मुख्याध्यापक गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याशी असभ्य वर्तन करत असल्याचं शिक्षिकेने यावेळी सांगितलं. 

महिला शिक्षेकेने केलेल्या आरोपानुसार "मुख्याध्यापक माझ्या गळ्यात हात टाकायचे. यानंतर ते विद्यार्थ्यांना फोटो काढण्यास सांगायचे. घरी जातानाही ते माझ्यावर जबरदस्ती करत कारमध्ये बसण्यास सांगायचे. यावेळी कारमध्ये आणखी व्यक्ती बसलेली असायची. त्याच्यासमोर ते माझ्याशी अश्लील वर्तन करायचे". आपण विरोध केला असता मुख्याध्यापक मला वारंवार नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी द्यायचे असा आरोप शिक्षिकेने केला आहे. 

महिला शिक्षिकेने तक्रार केल्यानंतर एसबीएने या प्रकरणाचा तपास केला. तपास केला असता सर्व आरोप खरे असल्याचं सिद्ध झालं. यानंतर मुख्याध्यापकाच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवत बीएसएला पत्र लिहिण्यात आलं. तपासाचा अहवाल मिळाल्यानंतर मुख्याध्यापक करतार सिंगला निलंबित करण्यात आलं आहे.