Viral Video: अपघातग्रस्त गाडीला चक्क वीटा लावून केलं प्लास्टर, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Video) एक तरुण कारच्या मागील चाकाच्या वरील भाग दुरुस्त करताना दिसत आहे. गाडीचा हा भाग पूर्णपणे तुटलेला असतो. पण तरुण या ठिकाणी नवा पत्रा लावण्याऐवजी किंवा इतर काही पर्यायी दुरुस्ती करण्याऐवजी गवंड्याप्रमाणे विटा आणि सीमेंट घेऊन लेपण्यास सुरुवात करतो    

Updated: Feb 15, 2023, 04:07 PM IST
Viral Video: अपघातग्रस्त गाडीला चक्क वीटा लावून केलं प्लास्टर, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित title=

Desi Jugaad Video: भारतामध्ये जुगाड करणारे कमी नाहीत. एखादी गोष्ट फार कमी वेळात किंवा मग अगदी सोप्प्या उद्धतीने पूर्ण करायची असेल तर अनेकदा भारतीय जुगाड करत असतात. याचे व्हिडीओ, फोटोही व्हायरल होत असतात. भारतीयांना या जुगाड तंत्रज्ञानासाठी ओळखलं जातं. यामध्ये जास्त वेळ, पैसा खर्च न करता तुम्ही अनेक गोष्टी करु शकता. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना असंही केलं जाऊ शकतं यावर विश्वासच बसत नाही आहे. आपली कार अपघातग्रस्त झाली असेल किंवा एखादा भाग निखळला असेल तर आपण गॅरेजमध्ये जातो. पण या व्हिडीओत अजब कारनामा पाहायला मिळाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुण कारच्या मागील चाकाच्या वरील भाग दुरुस्त करताना दिसत आहे. गाडीचा हा भाग पूर्णपणे तुटलेला असतो. पण तरुण या ठिकाणी नवा पत्रा लावण्याऐवजी किंवा इतर काही पर्यायी दुरुस्ती करण्याऐवजी गवंड्याप्रमाणे विटा आणि सीमेंट घेऊन लेपण्यास सुरुवात करतो. सुरुवातीला आपल्याला हा तरुण नेमकं काय करत आहे असा प्रश्न पडतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Indian Sarcasm (@officialtis)

पण काही वेळाने तरुण विटा आणी सीमेंट लावल्यानंतर तिथे प्लास्टर करतो. यानंतर तिथे कारला साजेसा काळा रंग देतो. कार जेव्हा पूर्पणणे तयार होते, तेव्हा त्याने प्लास्टर केलं आहे असं अजिबात वाटत नाही. नवी गाडी पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. 

देसी जुगाड करत मिस्त्रीने या कारला एकदम नवा लूक दिला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर officialtis नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओला 26 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.