Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिहोर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. विटा खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करत हत्या (Murder) करण्यात आली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी मजुराने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर तिथेच बसून राहिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. आरोपीला कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.
हत्येची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून वाहतूक ठप्प केला होती. यावेळी तिथे जमलेल्या गर्दीनेही गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. पोलीस आणि प्रशासनाने समजूत घातल्यानंतर अखेर त्यांनी माघार घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कर्बला पुलाजवळ विटा घेण्यासाठी सूरज कुशवाहा पोहोचला होता. यावेळी आरोपी मजुराने कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला केला. आरोपीने धारदार कुऱ्हाडीने हल्ला करत सूरजच्या मृतदेहाचे तुकडे केले. नंतर त्याने त्याचं शीरही धडापासून वेगळं केलं.
हत्या केल्यानंतर आऱोपी मजूर तिथेच बसून होता. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीची मानसिक स्थिती योग्य नाही. ज्यामुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांमध्ये संताप आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य तपास करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, आरोपीने सूरजवर हल्ला का केला हे अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
राजस्थानच्या (Rajasthan) पाली जिल्ह्यातही एक धक्कादायक घटना घडली आहे. सराधना परिसरात एका तरुणाने वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या (Murder) केली. महिला जंगलात बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेली असता आरोपीने तिच्यावर हल्ला केला. नंतर त्याने महिलेच्या चेहऱ्याचं मांस ओरबाडून खाल्लं. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सराधना गावात राहणारी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेली होती. यावेळी तरुणाने तिच्यावर हल्ला केला. तरुणाने वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केलं. या हल्ल्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने तिथेच बसून महिलेच्या चेहऱ्याचं मांस खाण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने आपला शर्ट काढला आणि महिलेचा चेहरा झाकला