Andhra Pradesh Beer Video: गेल्या अनेक दिवसांपासून भारतात बियरची (Beer ) क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशभरात बियरच्या विक्रीचं प्रमाण देखील वाढलंय. त्यामुळे बियर व्यवसायात चांगली वृद्धी झाल्याचं दिसतंय. अशातच आता एक व्हिडिओ तुफान (Viral Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावलाय. बियरच्या बॉटल्सने भरलेला एक ट्रक भर रस्त्यात (beer truck overturned on the highway) उलटला. त्यानंतर जे काही झालं ते पाहाच...
फुटक मिळालं तर सोडायचं नाही, असा अलिखित नियमच भारतात असतो. याच गोष्टीची प्रचिती व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशात हायवेवर बिअरने भरलेला ट्रक उलटल्याने बिअरच्या बाटल्या सर्वत्र पसरल्या. हायवेवर बिअर लुटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Trending Video) झाला आहे. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील असल्याची माहिती समोर आलीये. बिअरच्या 200 पेट्या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला अन् लोकांची रिघच लागली.
बिअरची बाटली घेण्यासाठी लोक इकडे तिकडे धावत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. बिअरचा ट्रक पलटल्याची बातमी आजूबाजूच्या लोकांच्या कानावर पडताच त्यांनी बिअरच्या बाटल्या घेण्यासाठी धाव घेतली. लूटमार करणाऱ्यांमध्ये लहान मुलं, तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश असल्याचं दिसतंय. लोकं खोऱ्यानं उचलून बाटल्या पळवताना दिसत आहेत.
VIDEO | A vehicle carrying 200 cartons of beer overturned in Andhra Pradesh's Anakapalli on Tuesday, following which people rushed to grab the beer bottles. pic.twitter.com/nIYHQCF9U8
— Press Trust of India (@PTI_News) June 6, 2023
दरम्यान, कोणी टॉवेल गुंडाळून रस्त्यावर आलंय. तर कुणी बनियनवर दिसतंय. एवढंच काय तर रस्त्यावरून जाणायेणाऱ्यांनी गाडी बाजूला लावली आणि मावेल तेवढ्या बाटल्या उचलल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर (Watch viral video) तडप ही ऐसी है..!, असं म्हणत लोकांना पोटधरून हसू आलंय. तर काहींनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे. तुमची तृप्ती होईल पण ज्याचं नुकसान झालं त्याचं काय? असा सवाल काहींनी विचारला आहे.