छप्पर फाड पगारवाढ; 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी

जाणून घ्या या आयोगामुळं तुमच्या मासिक वेतनात नेमकी किती वाढ होणार...   

Updated: Oct 10, 2022, 03:15 PM IST
छप्पर फाड पगारवाढ; 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी title=
8th Pay Commission latest Updates read details about salary structure

8th Pay Commission latest Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) सध्याच्या घडीला देशभरात सातव्या वेतन आयोगासाठी कुठे शिफारसी केल्या जात आहेत. तर, कुठे काही कर्मचाऱ्यांना याचा फायदाही होताना दिसत आहे. काही कर्मचाऱ्यांनी (Employees) शिफारसीहून कमी पगार मिळाल्याचाही सूर आळवला आहे. दरम्यान, कर्मचारी संघटनांकडून सदर बाबतीत एक प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो लवकरच केंद्राकडे सोपवण्यात येणार आहे. यामध्ये शिफारसीनुसार पगारवाढ किंवा आठवा वेतन आयोग अंमलात आणण्याची मागणी करण्यात येणार आहे. असं असलं तरीही केंद्राकडून मात्र सरकारच्या कोणत्याही सदनात यासंबंधीचा विचार करण्यास नकार देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या आशा मात्र अद्यापही माळवलेल्या नाहीत. 

अधिक वाचा : Triwizard Chess: बुद्धीबळाच्या पटावर आता तीन जण खेळणार, जाणून घ्या नियम

किमान वेतन मर्यादा 26 हजार रुपये (Basic salary)
कर्मचारी संघटनांनी अधोरेखित केल्यानुसार सध्या किमान वेतन मर्यादा 18 हजार रुपये इतकी आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) ला प्राधान्य देण्यात आलं आहे. सध्या 2.57 पटींनी असणाऱ्या या फॅक्टरला सातव्या वेतन आयोगात 3.68 च्या पटीत ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. असं झाल्यास कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन (Salary) 18 हजारांहून 26 हजार रुपयांवर पोहोचणार आहे. 

4th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? 
वेतन वृद्धी: 27.6%
किमान वेतनमान: 750 रुपये

5th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? 
वेतन वृद्धी: 31%
किमान वेतनमान: 2,550 रुपये 

6th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? (Fitment Factor)
फिटमेंट फॅक्टर: 1.86 पट
वेतन वृद्धी: 54%
किमान वेतनमान: 7,000 रुपये 

अधिक वाचा : Indian Temple: भारतातील एक अनोखे मंदिर; जिथे गेल्या 1000 वर्षांपासून होते मांजरीची पूजा!

 

7th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? (Fitment Factor)
फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
वेतन वृद्धी: 14.29%
किमान वेतनमान: 18,000 रुपये 

8th Pay Commission मध्ये किती पगारवाढ? (Fitment Factor)
फिटमेंट फॅक्टर: 3.68 पटींनी संभाव्य
वेतन वृद्धी: 44.44%
न्यूनतम वेतनमान: 26000 रुपये संभव