7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, DA वाढीनंतर आता पुन्हा एवढी पगारवाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) आनंदाची बातमी आहे.  

Updated: Aug 11, 2021, 04:03 PM IST
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, DA वाढीनंतर आता पुन्हा एवढी पगारवाढ title=

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून 28 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. पण आता कर्मचारी जून महिन्यातील महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत. सरकार लवकरच जून महिन्यातील थकीत महागाई भत्त्याचा हफ्ता देणार असल्याचं म्हटलं जात आहे. असं झाल्यास महागाई भत्त्यात एकूण 3 टक्कयाने वाढ  होऊन तो 28 वरुन 31 इतका होईल. याचा थेट परिणाम हा पगारावर होईल. परिणामी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा पगारवाढ होईल. (7th Pay CommissionAfter 28 persent da there is another good news Central employees salary will increase again)

जून महिन्यातील 3 टक्के DA वाढ होणं बाकी  

जून 2021 मधील महागाई भत्ता अजून निश्चित झालेला नाही. पण, जानेवारी ते मे 2021 च्या AICIPI आकड्यांनुसार, 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ होईल. JCM सेक्रेटरी   शिव गोपाल मिश्रा यांच्यानुसार, लवकरत जूनमधील महागाई भत्त्याबाबतची घोषणा होईल. पण या जून महिन्यातील थकित महागाई भत्त्याची रक्कम कधी मिळणार, याबाबत अजून निश्चितता नाही. पण 3 टक्के वाढ झाल्यानंतर महागाई भत्ता हा 31 टक्के इतका होईल. त्याचाच परिणाम हा थेट पगारावर होईल. 

महागाई भत्त्यात 2020 मध्ये 3 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा जून 2020 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. नववर्षात म्हणजेच  जानेवारी 2021मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली. एकूणच 3 वेळा वाढ झाल्याने महागाई भत्ता हा 28 टक्के इतका झाला. जून महिन्यातील 3 टक्के वाढीनंतर महागाई भत्ता हा 31 टक्क्यांवर (17+4+3+4+3) जाऊन पोहचेल.     

पे ग्रेडनुसार पगारात वाढ 

केंद्र सरकारने मागील 18 महिन्यात महागाई भत्त्यावर असलेले निर्बंध हटवले. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.  आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 28 टक्क्यांनुसार DA आणि DR ची रक्कम दिली जाईल. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्तीधारक बेसिक पे आणि ग्रेडनुसार पगारात किती वाढ होईल, याचा अंदाज बांधू शकतो.  

सध्या पगारात किती वाढ होणार? 

7th Pay Commission मॅट्रिक्सनुसार, ग्रेड 1 केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वेतन 18 हजार ते 56 हजार 900 या दरम्यान आहे. थोडक्यात काय तर ग्रेड 1 कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही 18 हजार रुपये इतकी आहे. या किमान पगाराच्या आधारावर कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगारात किती वाढ मिळेल, हे जाणून घेऊयात. 

किमान बेसिक सॅलरीवर आधारित आकडेवारी

28 टक्के महागाई भत्यावर आधारित आकडेवारी

18 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्याचा एकूण वार्षिक महागाई भत्ता हा 60 हजार 480 रुपये इतका असेल. पण आता वेतनात वर्षाला 23 हजार 760 इतकी वाढ होईल.

1. कर्मचाऱ्याचा बेसिक पगार                     18,000 रुपये 

2. नवीन महागाई भत्ता (28%)                   दरमहा 5 हजार 40 रुपये 

3. आतापर्यंतचा महंगाई भत्ता (17%)          दरमहा 3 हजार 60 रुपये

4. महागाई भत्तात किती वाढ                      5040-3060 = 1 हजार 980 दरमहा

5. पगारातील वार्षिक वाढ                         1980X12= 23 हजार 760 रुपये. 

31 टक्के DA वर आधारित आकडेवारी

आता जर जून महिन्यातील महागाई  भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होते तर, एकूण DA हा 31 टक्के होईल. त्यामुळे 18 हजार रुपये बेसिक पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा एकूण 6 हजार 960 रुपये इतका असेल. पण फरक पाहिला तर पगारात वार्षिक 30 हजार 240 रुपये इतकी वाढ होईल.

1. कर्मचाऱ्याचा बेसिक पगार                     18,000 रुपये

2. नवा महागाई भत्ता (31%)                       5 हजार 580 रुपये दरमहा

3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (17%)         3 हजार 60 रुपये दरमहा 

4. महागाई भत्त्यात झालेली वाढ                   5580-3060 = 2 हजार 520 रुपये दरमहा

5. पगारात झालेली वार्षिक वाढ                     2520X12= 30 हजार 240 रुपये

जास्तीत जास्त बेसिक सॅलरीवर आधारित आकडेवारी
 
लेव्हल 1 असलेल्या कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त बेसिक सॅलरी ही 56 हजार 900 इतकी असते. याच आधारावर आपण आकडेवारी पाहुयात. 56 हजार 900 रुपयांच्या बेसिक सॅलरीवर  एकूण वार्षिक महागाई भत्ता हा 1 लाख 91 हजार 184 रुपये इतका होईल. पण त्यातील फरकाचा विचार केला तर पगारात वार्षिक 75 हजार 108 रुपयांची वाढ होईल.   

1. कर्मचाऱ्याचा बेसिक पगार                     56 हजार 900 रुपये

2. नवीन महागाई भत्ता (28%)                    15 हजार 932 रुपये दरमहा

3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (17%)           9 हजार 673 रुपये दरमहा

4. महागाई भत्त्यात किती वाढ                      15 हजार 932-9 हजार 673 = 6 हजार 259 रुपये दरमहा

5. वार्षिक पगारातील वाढ                         6 हजार 259X12= 75 हजार 108 रुपये

31% DA वर आधारित आकडेवारी

1. कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी                     56 हजार 900 रुपये

2. नवीन महागाई भत्ता (31%)                     17 हजार 639 रुपये दरमहा

3. आतापर्यंत महागाई भत्ता (17%)               9 हजार 673 रुपये दरमहा 

4. महागाई भत्ता किती वाढला                      17 हजार 639-9 हजार 673 = 7 हजार 966 रुपये दरमहा

5.वार्षिक वेतनातील वाढ                           79 हजार 66 X 12= 95,592 रुपये

31 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबानुसार, 56 हजार 900 रुपये या बेसिक सॅलरीवर वार्षिक महागाई भत्ता हा 2 लाख 11 हजार 668 रुपये इतका असेल. पण जेव्हा यातील फरकाचा विचार केला गेला असता वार्षिक  पगारात 95 हजार 592 रुपये इतकी वाढ होईल. 

दरम्यान, एकूण पगार किती असेल याबाबतचा आकडा हा HRA सह एकूण सर्व भत्ते एकत्र केल्यावरच समजेल. वरील सर्व आकडेवारी ही महागाई भत्ता वाढल्यानंतर सर्वसाधारण वेतनात किती वाढ येईल, याची कल्पना यावी, यासाठी दाखवण्यात आली आहे. यानंतर जून 2021 च्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढल्यास, त्यानुसारच पगार वाढेल. त्यानंतर ही एकूण आकडेवारी 31 टक्के होईल.