तुमच्या काळात 88 आमच्या 56 हजार; काळानुरूप असा झाला सोन्याचा विक्रमी प्रवास

चार वर्षांत सोन्याचा दर दुप्पटीहून जास्त 

Updated: Aug 11, 2021, 03:10 PM IST
तुमच्या काळात 88 आमच्या 56 हजार; काळानुरूप असा झाला सोन्याचा विक्रमी प्रवास title=

मुंबई : Golden Journey Of Gold : प्रत्येकाच्या घरात असलेलं जुन्या सोन्याची एक वेगळी गोष्ट आहे. त्या सोन्याच्या दागिन्यांमागे असंख्य आठवणी आहेत. हे सोनं कोणत्या दरांनी खरेदी केलंय? याच्या देखील वेगवेगळ्या आठवणी आपल्या आजी-आजोबांकडे आहेत. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सोन्याचा दर काय होता? हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. (Golden Journey of Gold : Rise of Gold from Independence till today gold has given returns more than 52000 Since ) कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात जुनं सोनं हे असतं. एक सामान्य अंदाज असा आहे की, प्रत्येकाच्या घरात जवळपास 20 किलो सोनं हे असतंच. तर जाणून घेऊया सोन्याचा आतापर्यंतच्या 75 वर्षांचा प्रवास... 

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सोन्याने गाठला 52 हजार टक्क्यांनी वाढलं 

संपूर्ण देश 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत आहे. यंदा आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन काहींसाठी खास असणार आहे. ज्यांच्या घरी 1947 सालातील सोनं असेल तर तुम्ही किती फायद्यात आहात हे समजून घ्या. जर तुमच्याकडे 1947 सालचं सोनं असेल तर तुम्ही 52 हजार टक्के फायद्यात आहात. 1947 साली सोन्याचा दर हा 100 रुपयांपेक्षा देखील कमी होता. जो दर आज 46 हजार रुपयांजवळ आहे आणि 56 हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. 

1947 साली सोन्याचा दर 88 रुपये 

स्वातंत्र्यकाळात सोन्याचा दर 10 ग्रॅमकरता 88 रुपये होती. सोन्याचा 100 रुपयांचा दर गाठण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला. 1959 मध्ये पहिल्यांदा सोन्याचा दर 100 रुपयांच्या पार गेला. तेव्हा सोनं 102 रुपये झालं. 100 ते 500 रुपयांपर्यंतचा प्रवास गाठण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी लागला. अखेर 1074 मध्ये सोन्याचा दर 500 रुपयांच्या पार गेला. मात्र यानंतर सोन्याच्या दरात बदल झाला. कारण 500 ते 1000 रुपये आणि 1000 रुपये ते 2000 रुपयांपर्यंतचा प्रवास हा अवघ्या 5-5 वर्षांत झाला. 1985 ते 2007 पर्यंत सोन्याच्या दरात 5 टक्के वाढ झाली. 2007 मध्ये सोनं 10 हजारांपर्यंत पोहोचलं 

ग्लोबल मंदीत सोनं आणखी चमकलं 

पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट आला आहे. 2008 मध्ये आलेल्या ग्लोबल मंदीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली. गुतंवणुकीचे सर्व पर्याय फिके पडले. मग शेअर बाजार असो किंवा रिअर इस्टेट, म्युच्युअल फंड असो वा किंवा इतर गुंतवणूक. सगळीच फिकी पडली. मात्र त्यावेळी सोनं सर्वात मोठा हिरो ठरला. संकट काळात सोन्याने आधार दिला. 2008 मध्ये मंदीत सोन्याने 25 टक्के रिटर्न दिले. यानंतर सोन्यावरचा विश्वास वाढला. 2008 मध्ये बारा हजार असलेलं सोनं 2011 मध्ये थेच 26 हजार झालं. 

सोनं गाठणार 60 हजार रुपयांचा आकडा 

यानंतर सोन्याचा प्रवास अतिशय सुंदर सुरू झाला. 2020 मध्ये सोन्याचा दर 50 हजार आणि त्यानंतर 56000 पर्यंत पोहोचले. आता सोन्याच्या दराने उच्चांकीपेक्षा 10 हजार कमीचा आकडा गाठला आहे. आता सोन्याचा दर 46 हजार रुपयांच्या आसपास आहे. अवघ्या दीड दोन वर्षांमध्ये सोन्याचा दर 60 हजार रुपये होणार आहे. 

स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत चांदीत झाला असा बदल 

चांदीचा प्रवास काही कमी रोचक नाही. सोन्या-चांदीची जोडी बहुतेक 75 वर्षांपासून हिट आहे. स्वातंत्र्याच्या वेळी एक किलो चांदी 107 रुपयांना उपलब्ध होती. आता एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 65 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. काही काळापूर्वी चांदीची किंमत 75 हजाराच्या वर गेली होती. 

75 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी चांदी गेल्या वर्षीच वाढली. मार्च 2020 मध्ये, सुमारे 33 हजार 500 ची विक्री झालेली चांदी अवघ्या पाच महिन्यांत म्हणजे ऑगस्टमध्ये 78 हजारांच्या आसपास विकण्यास सुरुवात झाली, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की एकदा जगाची अर्थव्यवस्था कोरोनापासून पूर्णपणे सावरली, तर चांदी देखील 2-3 वर्षात एक लाखापर्यंत जाऊ शकते.