नवी दिल्ली : देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर सैन्यदलाच्या संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आलेले प्रमुख पाहुणे सिरील रामाफोसा यांच्या उपस्थितीत संचलनाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. ध्वजारोहणानंतर सुरु झालेल्या या संचलनात देशाभिमानाने प्रफुल्लित असे चेहरे पाहायला मिळत आहेत. राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या संचलनात तिन्ही प्रमुख सैन्यदल जवानांसह अन्स सुरक्षा तुकड्या, विविध राज्यातील विद्यार्थी आणि कलाकारांचाही समावेश असणार आहे. या लक्षवेधी संचलनामध्ये शौर्य, कला, वीरता असे विविध पैलू पाहता येणार असून, बलसागर भारताची झलक पाहता य़ेत आहे. यंदाच्या वर्षीची ही परेड खास असणार आहे. ज्यामध्ये एकूण २२ चित्ररथांचा समावेश असणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्रपती आणि पंतप्रधान यांनीही देशवासियांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या शुभेच्छा सर्वांपर्यंत पोहोचवल्या. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या २६ विद्यार्थ्यांचाही या परेडमध्ये सहभाग असून, एका खुल्या जीपमध्ये बसून ते या कार्यक्रमात सहभागी होतील. जवळपास ९० मिनिटांसाठी हे संचलन होणार आहे.
Visuals of the K-9 Vajra-T, a self-propelled howitzer, commanded by Captain Devansh Bhutani #republicdayindia pic.twitter.com/czufPJMQBK
— ANI (@ANI) January 26, 2019
WATCH NOW:
PM @narendramodi greets Guests of Honour South African president Cyril Ramaphosa at #Rajpath #RepublicDay celebrations on @DDNational & https://t.co/doXKK2sVDM#RepublicDayOnDD #RepublicDayParade #RepublicDay2018 #RepublicDay #Doordarshan pic.twitter.com/hweAhLCXxn— Doordarshan National (@DDNational) January 26, 2019
A bird’s eye view of #Rajpath !! #RepublicDayParade2019 .
DON'T MISS #RepublicDay2019 #RepublicDay on @DDNational & Live-Stream on https://t.co/OFUmYgGtxS #RepublicDayOnDD #Doordarshan pic.twitter.com/UBG55InVqO
— Doordarshan National (@DDNational) January 26, 2019
Prime Minister Narendra Modi pays tribute at the Amar Jawan Jyoti. #RepublicDay2019 pic.twitter.com/mykhT7oxxP
— ANI (@ANI) January 26, 2019
११ वर्षांनंतर 'सीआयएसएफ'चा सहभाग
महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाला सुरक्षा पुरवणाऱ्या सीआयएसएफचा चित्ररथ जवळपास ११ वर्षांनंतर यंदाच्या संचलनामध्ये सहभागी झाला आहे. यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये समाधीला सुरक्षा पुरवणारे जवान दिसणार आहेत. की झांकी में महात्मा गांधी की समाधि पर सुरक्षा में तैनात जवानों को दिखाया जाएगा. सैनिक तुकडीचा हा विभाग देशातील प्रमुख संस्था आणि कार्यालयांच्या सुरक्षेसाठी तैनात असते. जवळपास १ लाख ७० हजार इतकी सैनिक संख्या असणाऱ्या या दलाचं यंदाचं हे सुवर्ण जयंती वर्ष आहे.
तीन वर्षांनंतर धडधडणार रेल्वे
भारतीय रेल्वे जवळपास तीन वर्षांच्या अंतरानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संचनात सहभागी होत आहे. यामध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा गांधी, राष्ट्रपिता होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येत आहे. त्यासोबतच बुलेट ट्रेन आणि ट्रेन १८ची प्रतिकृतीही दाखवण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून याविषयीची माहिती देण्यात आली होती.