अरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ)

भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 13, 2017, 06:00 PM IST
अरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ) title=

तामिळनाडू : भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.

अंधश्रद्धेचा विळखा

देशातील अनेक मंदिरे आणि तिथल्या रूढी-परंपरांबद्धल तर आपल्याला माहिती असेलच. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबत सांगणार आहोत जिथे, विचित्रच रूढी परंपरा आहेत. ज्या थांबविण्यासाठी न्यायालयानेही आदेश दिले होते. पण, आजही इथे हा प्रकार सुरूच आहे.

मुली राहतात नग्न

तामिळनाडूतील मदुरै हे तामिळनाडूतील एक सुप्रसिद्ध मंदिर. या मंदिरातील 'येजाईकाथा अम्मान' नावाच्या या मंदिरात 60 वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून ही परंपरा सुरू आहे. या ठिकाणी परंपरेच्या नावाखाली मुलींना चक्क 15 दिवस पूर्णपणे नग्न अवस्थेत ठेवले जाते. ही प्रथा पार पाडताना 7 मुलींची निवड केली जाते. या मुलींचे कपडे उतरवून पुढील 15 दिवसांसाठी अर्धनग्न केले जाते. तसेच, या मुलींच्या शरीराचा अर्धनग्न पृष्ठभाग फुले किंवा इतर दागिण्यांनी झाकला जातो.

पुजारी करतो मुलींची निवड

या विचित्र आणि तितक्याच विक्षिप्त प्रथेचे अनुकरण करण्यासाठी सुमारे 60 गावे सहभागी होतात. पण, या परंपरेसाठी केवळ 7 मुलींची निवड होते. या निवडप्रक्रियेची पद्धतही ठरलेली आहे. ज्या कुटूंबातील मुलीची या विधीसाठी निवड होते ते कुटूंब प्रचंड नशिबवान समजले जाते. निवड झालेल्या मुलींना विवस्त्र अवस्थेत मंदिराच्या पुजाऱ्यांसोबत 15 दिवस रहावे लागते. हे पुजारी या मुलींची देवी मानून पूजा करतात. ही प्रथा पूर्ण करण्यासाठी केवळ 10 ते 14 या वयोगटातील मुलींचीच निवड केली जाते. सुरूवातीला या मुली फक्त 6 वर्षे वयापर्यंतच्या असायच्या. पण, मंदिरातील पुजाऱ्यांनी स्वत:हूनच मोठ्या मुलींची मागणी केली तेव्हापासून, 10 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींची निवड करण्यात आली.

न्यायायलयाने दिले कपडे घालण्याचे आदेश

दरम्यान, एका मुलाखती दरम्यान, जिल्हाधिकारी के. वी. राघव यांनी सांगितले की, ही प्रथा गेली अनेक वर्षे चालत आली आहे. इथे येणाऱ्या मुली या आई-वडीलांच्या इच्छेनुसार स्वत:हूनच येतात. मात्र, न्यायालयाने आता आता आदेश दिले आहेत, की या मुलींनी कपडे घालणे अनिवार्य आहे. दागिणे घालायचेच असल्यास त्या मुली कपड्यावरून दागिणे घालू शकतातत. बालअधिकार कायद्यानुसार अशा प्रकारे इते राहणे या मुलींसाठी मोठे झाल्यावर अडचणीचे ठरू शकते, असे न्यायालयाचे मत आहे.