भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ, गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण

भारतात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सतत भर पडत आहे.   

Updated: May 11, 2020, 11:52 AM IST
भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ, गेल्या २४ तासांत ४२१३ नवे रुग्ण title=

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे समस्त भारतीयांसाठी ही अत्यंत चिंतेचीबाब आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली आहे. रविवारी ही संख्या ६२ हजार ९३९ एवढी होती. सध्या ४४०२९  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २२०६ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

दिलासादायक बाब म्हणजे २ हजार १०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २२ हजार १७१ रुग्ण आढळले आहेत. तर ८३२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८ हजार १९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढला आहे. पण या काळात बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.