जवानाच्या गोळीबारात ४ जवानांचा मृत्यू, १ जवान जखमी

छत्तीसगडमध्ये बीजापुरामधील बसागुडा येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये आज एका जवानाने ओपन फायरिंग केली. ज्यामध्ये ४ जवानांचा मृत्यू झाला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 9, 2017, 08:34 PM IST
जवानाच्या गोळीबारात ४ जवानांचा मृत्यू, १ जवान जखमी title=

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये बीजापुरामधील बसागुडा येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये आज एका जवानाने ओपन फायरिंग केली. ज्यामध्ये ४ जवानांचा मृत्यू झाला आहे.
तर एक जवान गंभीररित्या जखमी झाला आहे. दंतेवाडा रेंजचे डीआईजी सुंदर राज यांनी ही माहिती दिली.

बासागुडामध्ये सीआरपीएफच्या 168 बटालियनच्या एका जवानाने आज संध्याकाळी अचानक आपल्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत 4 जवानांचा मृत्यू झाला तर 1 जवान जखमी झाला आहे. 

डीआईजी सुंदरराज यांनी घटनेची पुष्टी करत म्हटलं की, संध्याकाळी 5 वाजता जवान संतरामने बासागुडा कॅम्पमध्ये उपस्थित आपल्या सहकाऱ्यांवर अंधाधुंध फायरिंग केली. गोळ्या लागल्याने 4 जवानांचा मृत्यू झाला. या जवानाला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

शहीद जवानांमध्ये विक्की शर्मा, राजवीर सिंह, शंकर राव आणि मेघ सिंह यांचा समावेश आहे. गजानंद हा जवान जखमी झाला आहे.