विजय माल्‍याकडून 3600 कोटी वसूल 11 हजार कोटी अजून बाकी

 फरार विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाकडून आणखी एक धक्का

Updated: Oct 26, 2020, 10:34 PM IST
विजय माल्‍याकडून 3600 कोटी वसूल 11 हजार कोटी अजून बाकी title=

नवी दिल्ली : फरार विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाकडून आणखी एक धक्का बसला आहे. कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी मल्ल्याच्या युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग्स लिमिटेडने (यूबीएचएल) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. किंगफिशर एअरलाइन्सची थकबाकी वसूल करण्यासाठी कंपनी बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले होते.

न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने कंपनीला दिलासा देण्यास नकार दिला. त्याच वेळी एसबीआयच्या नेतृत्वात असलेल्या बँकांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (मुकुल रोहतगी) यांनी फरार मल्ल्याकडून सुमारे 3600 कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती कोर्टाला दिली असून अद्याप ११ हजार कोटींची वसुली होणे बाकी असल्याचं म्हटलं आहे.

रोहतगी यांनी असा दावा केला की, एनफोर्समेंट डायरेक्टरेटने (ईडी) कंपनीची मालमत्ता जप्त केली नव्हती पाहिजे कारण या मालमत्तांवर बँकांचा पहिला दावा होता.

महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी 2018 मधील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, यूबीएचएलची एकूण थकबाकी सुमारे 7,000 कोटी रुपये आहे.