लडाख : भारतीय जनता पक्षाने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 26 जागांवर झालेल्या स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल निवडणुकीत भाजपने 15 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 9 जागा जिंकल्या आहेत. अन्य दोन जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.
केंद्रशासित प्रदेश लडाखच्या स्थापनेनंतर प्रथमच येथे मतदान झाले. यापूर्वी अनेक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती, त्यामुळे एका शिष्टमंडळाने दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतरच निवडणूक घेण्यात आली.
BJP wins 15 seats & Congress wins 9 seats in Ladakh Autonomous Hill Development Council election. Independent candidates win 2 seats.
Elections were held for a total of 26 seats.
— ANI (@ANI) October 26, 2020
भाजप आणि काँग्रेसने सर्व 26 जागा लढवल्या. आम आदमी पक्षाने 19 जागांवर उमेदवार उभे केले होते. एकूण 23 अपक्ष उमेदवार होते. स्वायत्त हिल काउंसिल निवडणुकीत पहिल्यांदा 23 ऑक्टोबरला मतदान हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने झाली. एकूण 54 हजाराहून अधिक लोकांनी मतदान केले होते.
BJP’s landslide victory in Leh Autonomous Hill Development Council elections clearly reflects Ladakh’s unwavering trust in BJP and PM @narendramodi’s leadership.
I thank people of Ladakh for choosing development & prosperity.
Congratulations to our karyakartas of @BJP4Ladakh.
— Amit Shah (@AmitShah) October 26, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल निवडणुकीत भाजपाच्या विजयाबद्दल येथील कार्यकर्ते आणि जनतेचे अभिनंदन केले आहे.