श्रीनगर : उत्तर काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्याने रोखले. पाकिस्तानमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी इशारा दिला. भारतीय सैन्याच्या या कारवाई नंतर पाकिस्तानने कुपवाडा, उरी आणि पुंछमध्ये जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानने मोर्टार सोडले. भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरिकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आलं. पाकिस्तानच्या या गोळीबारात एकूण तीन भारतीय जवान शहीद झाले, तर तीन नागरिक ठार झाले. सबझियान भागात पाच जण जखमी झाले.
#WATCH | Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire along the Line of Control in Keran sector of Kupwara, earlier today.
(Video Source: Indian Army) pic.twitter.com/xxT57UkE35
— ANI (@ANI) November 13, 2020
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानलाही मोठे नुकसान सहन करावे लागले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानचे सहा ते सात सैनिक ठार झाले आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तानमधील अनेक पोस्ट उद्धवस्त करण्यात आल्या. या गोळीबारामुळे बीएसएफचे निरीक्षक राकेश डोभाल यांच्यासह दोन सैनिक गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दरम्यान दोघांचा ही मृत्यू झाला. या गोळीबारात तीन नागरिकही मरण पावले आहेत. दुसर्या नागरिकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH | 7-8 Pakistan Army soldiers killed, 10-12 injured in the retaliatory firing by Indian Army in which a large number of Pakistan Army bunkers, fuel dumps, and launch pads have also been destroyed: Indian Army Sources pic.twitter.com/q3xoQ8F4tD
— ANI (@ANI) November 13, 2020
शहीद बीएसएफचे सब इन्स्पेक्टर राकेश डोभाल हे गंगा नगर, ऋषिकेश, उत्तराखंड राहणार होते. युद्धबंदीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या दोन पोस्ट्स नष्ट झाल्या आहेत, तर पाच सैनिकही जखमी आहेत. याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. इतर शहीद जवानांची अद्याप ओळख पटलेली नाही.
#WATCH | Pakistan violated ceasefire along Line of Control in the Keran sector, of Jammu and Kashmir, earlier today pic.twitter.com/zQRLrSyxhc
— ANI (@ANI) November 13, 2020