अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींनी व्हायरल केला व्हिडिओ

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात चार तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर कथित रुपात सामूहिक बलात्कार करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 2, 2017, 11:39 PM IST
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींनी व्हायरल केला व्हिडिओ  title=

नवी दिल्ली : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात चार तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर कथित रुपात सामूहिक बलात्कार करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिक्षक विवेक कुमार यांनी सांगितले की, शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री एका १४ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. पीडित तरुणी दसरा मेळ्यातून आपल्या घरी जात असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी रविवारी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या तक्रारीनंतर चौकशी सुरु करण्यात आली आहे.

आरोपी युवकांनी पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण करत दिला अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओही आरोपींनी सोशल मीडियात व्हायरल केला.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांनी म्हटलं की, या प्रकरणी महिया आयोगाकडून योग्य ती मदत पीडित मुलीला करण्यात येईल. या प्रकरणी आरोपींना तातडीने अटक करत त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन शिक्षा सुनावली जावी.