जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात 230 दहशतवाद्यांचा खात्मा

दगडफेकीच्या घटना देखील झाल्या कमी

Updated: Dec 9, 2018, 04:39 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात 230 दहशतवाद्यांचा खात्मा title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी यावर्षी 230 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांचं प्रमाण देखील कमी झालं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून ते 14 सप्टेंबरपर्यंत 80 दिवसात 51 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर 15 सप्टेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत 85 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. आतापर्यंत या 232 दहशतवादी मारले गेलेत. खोऱ्यात अजूनही 240 दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावर्षी 25 जून ते 14 सप्टेंबर दरम्यान दगडफेकीच्या घटनेत सुरक्षारक्षकांसह 8 लोकांनाचा मृत्यू झाला आहे. तर 216 जण जखमी झाले आहेत. यानंतर 80 दिवसात म्हणजेच 15 सप्टेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान 2 लोकांचा मृत्यू झाला. तर 170 जण जखमी झाले आहेत. भाजपने महबुबा मुफ्ती सरकारकडून समर्थन काढून घेतल्याने 19 जूनला राज्यात राज्यपाल शासन लागू झालं आहे. यानंतर काश्मीर खोऱ्यात देखील सुरक्षेच्या बाबतीत सुधार झाला आहे.