करुणानिधींच्या चिंतेने आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू

आतापर्यंत धक्क्यातून राज्यात २१ जणांचा मृत्यू

Updated: Aug 2, 2018, 12:40 PM IST
करुणानिधींच्या चिंतेने आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू title=

चेन्नई : द्रमुक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक आणि चाहते चिंतेने व्याकुळ झाले असून या धक्क्यातून आतापर्यंत राज्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत करुणानिधी यांचे पुत्र आणि द्रमुकचे कार्याध्यक्ष स्टॅलिन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. करुणानिधी यांच्यावर कावेरी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीच्या चिंतेने पक्षाचे कार्यकर्ते तसेच समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्थिर असल्यामुळे द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. करुणानिधी यांना शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने त्यांना मध्यरात्री १.३० वाजता कावेरी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मंगळवारी कावेरी रुग्णालयाने दिलेल्या निवेदनाच्या हवाल्याने स्टालिन यांनी करुणानिधी यांच्या तब्येतील सुधारणा होत असल्याचे सांगितले. तसेच त्यांना आणखी काही काळ रुग्णालयात ठेवण्यात येईल असेही स्टालिन यांनी सांगितले आहे.

करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आतापर्यंत अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जावून त्यांची भेट घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सुरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी देखील करुणानिधी यांची भेट घेतली होती.