भारतात २०१८ मध्ये बेरोजगारीचा दर ३.५ टक्के

भारतासाठी चिंताजनक गोष्ट

Updated: Aug 2, 2018, 11:39 AM IST
भारतात २०१८ मध्ये बेरोजगारीचा दर ३.५ टक्के  title=

नवी दिल्ली : भारतात २०१८ या वर्षात बेरोजगारीचा दर ३.५ टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने अर्थात ILOनं व्यक्त केला आहे. दुसरीकडे चीनमध्ये सध्याच्या ४.७ टक्के बेरोजगारीच्या दरात वाढ होऊन तो ४.८ टक्क्यांवर जाईल असे आयएलओच्या अहवालात म्हटले आहे. रोजगाराच्या सुरक्षेचा विचार करता भारतात ७७ टक्के रोजगार असुरक्षित असणार आहेत आणि ही भारतासाठी चिंताजनक गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. चीनमध्ये मात्र ३३ टक्के रोजगार 'असुरक्षित' या श्रेणीत असणार आहेत.

2018 मध्ये रोजगार आणि सामाजिक स्थिती कशी असेल याचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात आर्थिक वाढ होणार असून अर्थव्यवस्था 5.5 टक्‍क्‍यांनी वाढणार असल्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. भारताची अर्थव्यवस्था 7.4 टक्‍क्‍यांच्या गतीने वाढण्याची शक्य़ता आहे.