2020 वर्ष याबाबतीत ही ठरलं वेगळं, भारतीय हवामान विभागाचा अहवाल

2020 या वर्षात आणखी नवा रेकॉर्ड...

Updated: Jan 8, 2021, 09:36 AM IST
2020 वर्ष याबाबतीत ही ठरलं वेगळं, भारतीय हवामान विभागाचा अहवाल title=

मुंबई : 2020 हे वर्ष आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं आहे. भारतीय हवामान विभागानं हवामान बदलाचा ई-अहवाल प्रसिद्ध केला. त्याआधारे हे स्पष्ट झालं आहे. सर्वांत उष्ण हवामानाची वर्षे म्हणून नोंदविल्या गेलेल्या वर्षांपैकी 12 वर्षे ही गेल्या 15 वर्षांतील म्हणजे 2006 ते 2020 मधील आहेत. 2001 ते 2010 आणि 2011 ते 2020 ही दशकं सर्वाधिक उष्ण दशकांपैकी आहेत. 

वर्ष 2020 हे 1901 नंतर 8 वे आणि सर्वात उष्ण वर्ष ठरले. गेल्या वर्षी अत्यंत प्रतिकूल वातावरणामुळे 1,565 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह, वीज कोसळण्यासारख्या घटनांमध्ये 815 लोक मरण पावले. आयएमडीच्या अहवालानुसार पूर, वादळे, विजांचा कडकडाट आणि शीतलहरीमुळे बिहारमध्ये सर्वाधिक 379 जणांचा मृत्यू झाला तर उत्तर प्रदेशात ही संख्या 356 आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, ही आकडेवारी माध्यमांच्या वृत्तावर आधारित आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की सन २००० हे सन १९०१ नंतरचे आठवे सर्वात उष्ण वर्ष होते. 

देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि पूर संबंधित घटनांमध्ये 600 हून अधिक लोकं मरण पावले. आसाममध्ये १२९, केरळमध्ये ७२, तेलंगणात ६१, बिहारमध्ये 54, महाराष्ट्रात ५०, उत्तर प्रदेशात ४८ तर हिमाचल प्रदेशात ३८ जणांचा मृत्यू झाला. आयएमडीच्या अहवालानुसार, वादळ आणि वीज कोसळल्याने 815 लोकांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये  २८०, उत्तर प्रदेशात २२०, झारखंडमध्ये १२२, मध्य प्रदेशात ७२, महाराष्ट्रात २३, आणि आंध्र प्रदेशात २० जणांचा मृत्यू झाला. शीतलहरीमुळे १५० लोक मृत्युमुखी पडल्याचे आयएमडीने म्हटले आहे. उत्तर प्रदेशात ८८, बिहारमध्ये ४५ आणि झारखंडमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये 1 जानेवारी रोजी एकाच दिवशी मृत्यू झाले होते.