मुंबई : तुम्ही गृहिणी (Housewives) असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही करत असलेल्या कामाचा लवकरच तुम्हाला मोबदला (Housewives work salary) मिळू शकतो. तशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गृहिणींसाठी (Housewives) खास खुशखबर असणार आहे. गृहिणींनाही मिळणार कामाचा पगार (Housewives will get work salary) मिळणार अशी चर्चा आहे. ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याइतकंच गृहिणींचं काम महत्वाचे असते हे अधोरेखित झाले आहे.
चूल आणि मूल एवढंच ज्यांचं विश्व असते, त्या गृहिणींना लवकरच त्यांच्या कामाचा रोख मोबदला मिळणाराय. त्यांनाही पगार मिळणार आहे. कारण गृहिणींचं काम हे ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याच्या कामाएवढंच महत्त्वाचं आहे. त्यांचा पगारही ठरवायला हवा, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केले आहे. तर तामिळनाडूत मक्कल निधी मय्यम पक्ष सत्तेत आल्यास गृहिणींना पगार आणि सोबत कॉम्प्युटर देखील मिळणार आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि ख्यातनाम सिने अभिनेते कमल हासन यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात तसं स्पष्ट केलंय... यावरून आता राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी याचं स्वागत केले आहे.
यामुळे गृहिणींच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यांना पैसा मिळेल, त्यांचे अधिकार वाढतील आणि त्या आणखी स्वतंत्र होतील, असं ट्विट थरूर यांनी केले आहे. तर ड्रामा क्वीन कंगना रनौतनं गृहिणींना पगार देण्याच्या मुद्यावरून पुन्हा एकदा पंगा केला आहे.
गृहिणींना मिळणार पगार? pic.twitter.com/2BkUWcQpEo
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 6, 2021
आम्ही आमच्या प्रेमाच्या माणसाबरोबर सेक्स करतो, त्याला प्राईस टॅग लावू नका. आमच्याच लेकरांवर प्रेम करण्यासाठी आम्हाला पैसे देऊ नका आमच्या छोट्याशा साम्राज्याच्या आम्ही राण्या आहोत.प्रत्येक गोष्टीकडे 'बिझनेस' म्हणून पाहू नका. असे तारे कंगनानं तोडले. आहे.
दरम्यान, गृहिणींना पगार मिळायला हवा का, अशी विचारणा झी २४ तासने महिलांकडे केली, तेव्हा काय प्रतिक्रिया आल्या, पाहा. घरात राबणारी आई किंवा हाऊसवाईफ यांच्या कामाचं मोल सगळ्यांनाच असतं. पण त्या कामाचं मूल्यमापन पगारात होणार असेल तर त्याचं स्वागतच व्हायला हवं... सरकार कायदा करेल तेव्हा करेल, या शुभ कार्याची सुरूवात प्रत्येकाने आपापल्या घरापासूनच करायला हवी.