आताची युवा पिढी कोणत्या गोष्टीवरुन डिप्रेशनमध्ये जाईल काहीच सांगता येत नाही. या पिढीच्या मनात नेमकं काय सुरु असतं हे पालकांना समजेपर्यंत मुलांनी टोकाचं पाऊल उचलेलं असतं. असाच एक प्रकार वाराणसी येथे घडला आहे. 20 वर्षांच्या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
श्रेया सिंग असं या तरुणीचं नाव आहे. केसगळती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ही तरुणी तणावात राहत होती. अनेक घरगुती उपाय केले तसेच अनेक डॉक्टरांची औषधे देखील घेतली. पण श्रेया सिंगचा प्रश्न काही सुटला नाही. मुलीने ही परिस्थिती इतकी गांभीर्याने घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही आणि यामध्ये तिने जीवन संपवलं.
पोलिसांनी सांगितले की, श्रेया सिंग ही मूळची चितबरागाव, बलिया येथील रहिवासी असून ती वाराणसीतील लालपूर येथील प्रज्ञापुरी कॉलनीमध्ये राहात होती. शुक्रवारी श्रेया घरी एकटीच होती. लहान भाऊ काही कामानिमित्त बाहेर गेला होता. तो परत आला तेव्हा त्याला बाहेरचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. आत गेल्यावर लहान भावाने खिडकीतून पाहिले की, श्रेया पंख्याला लटकलेली होती आणि आतील दरवाजा बंद होता.
श्रेयाचे वडिल धनोज सिंह लमहीच्या लालपुर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. श्रेयाचे वडिल आणि नातेवाईकांनी सांगितलं की, श्रेया गेल्या एक वर्षापासून डोक्यावरील केस विरळ होऊन टक्कल पडत असल्यामुळे हैराण होतील. या प्रश्नामुळे ती तणावात देखील होती. आम्ही अनेक डॉक्टर केले पण काहीच उपाय झाला नाही.
श्रेयाचे वडील धनोज सिंग हे गुटखा कंपनीत कामाला होते. श्रेयाने 25 तारखेला नोकरी बदलली होती. स्थानिक मेगाशॉपमध्ये फ्लोअर मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली. श्रेयासोबत काम करणाऱ्या लोकांनी असेही सांगितले की, श्रेयाला तिच्या गळणाऱ्या केसांची काळजी वाटत होती. अपघातानंतर वडील अंत्यसंस्कारासाठी मृतदेह त्यांच्या मूळ गावी चितबरागाव, बलिया येथील उसरौली गावात घेऊन गेले.