कोरोनानंतर देशात बर्ड फ्लूची दहशत; भारतात पहिल्या बळीची नोंद

आता देशात बर्ड फ्लूचा धोका समोर आला आहे.

Updated: Jul 21, 2021, 08:27 AM IST
कोरोनानंतर देशात बर्ड फ्लूची दहशत; भारतात पहिल्या बळीची नोंद title=

मुंबई : देशावर सध्या कोरोना व्हायरसचं संकट आहे. हे संकट संपता संपायचं नाव घेत नाहीये. अशातच आता देशात बर्ड फ्लूचा धोका समोर आला आहे. भारतात बर्ड फ्लूमुळे यावर्षीचा पहिला बळी गेला आहे. दिल्लीत एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दिल्लीतील एम्स रूग्णालयात (H5N1 avian influenza) मुळे 12 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बर्ड फ्लूच्या उपचारांसाठी या मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या एम्स रूग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

देशात बर्ड फ्लूची प्रकरणं गेल्या वर्षाच्या अखेरीस समोर आली होती. त्यावेळी दिल्लीसोबत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि हरिणायामध्ये बर्ड फ्लूची प्रकरणं आढळली होती. या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. हरियाणामध्ये तज्ज्ञांना H5N8चा सबटाइप देखील सापडला आहे मात्र हा व्यक्तींना संक्रमित करत नसल्याचं समोर आलं आहे.

 

दिल्लीतील प्राणी संग्रहालयात बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली होती

यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ल्याच्या जवळपास बर्ड फ्लूचे सँपल मिळाले होते. यानंतर दिल्ली सरकारने गाजीपूरचं पोल्ट्री मार्केट देखील बंद केलं होतं. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये प्राणी संग्रहलायतून घेतलेले सँपल पॉसिटीव्ह आले होते. मधल्या काळात बर्ड फ्लूची प्रकरणं येत नव्हती. मात्र एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेशच्या पोंग धरण तलावामध्ये याची प्रकरणं आढळली.