मनमोहन सिंग यांचा शिख दंगलींबाबत धक्कादायक खुलासा

शिख दंगलींबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.  

Updated: Dec 5, 2019, 05:08 PM IST
मनमोहन सिंग यांचा शिख दंगलींबाबत धक्कादायक खुलासा  title=

नवी दिल्ली : शिख दंगलींबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तत्कालिन गृहमंत्री नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर १९८४ ची दंगल टळली असती, असा खुलासा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. गुजराल यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त बोलताना सिंग यांनी हा खुलासा केला. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे लष्कराला पाचारण करावे, असा सल्ला गुजराल यांनी तत्कालीने केंद्रीय गृहमंत्री नरसिंह राव यांना दिला होता. त्यांचा हा सल्ला राव यांनी ऐकला असता तर १९८४ ची दंगल टाळता अली असती, असेही सिंग म्हणाले.

इंद्रकुमार गुजराल यांनी १९८४मधील शिख दंगल रोखण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. शिख दंगल उसळली, त्या रात्री नरसिंह राव यांची भेटही घेतली होती, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. गुजराल यांनी दिलेला सल्ला राव यांनी ऐकला असता, तर शीख दंगलीतील हिंसाचार टाळता आला असता.

गुजराल हे शिख दंगल उसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या तणावामुळे चिंताग्रस्त होते. त्यांनी नरसिंह राव यांची भेटही घेतली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ते गंभीर झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने लष्कराला पाचारण करायला हवे आणि जवान तैनात करायला हवेत, असे त्यांनी सांगितले होते.