नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १९,४५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोबाधितांची संख्या आता ५,४८,३१८ इतकी झाली आहे. यापैकी २,१०,१२० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३,२१,७२३ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
समाधानाची बाब हीच की रविवारच्या तुलनेत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एकाच दिवसात १९,९०६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे भारत २० हजाराचा टप्पा ओलांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, सुदैवाने गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात का होईना पण घटली आहे.
380 deaths and 19,459 new #COVID19 cases in last 24 hours. Positive cases in India stand at 5,48,318 including 2,10,120 active cases, 3,21,723 cured/discharged/migrated & 16,475 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/AzEwaXMKoT
— ANI (@ANI) June 29, 2020
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेले राज्य आहे. रविवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे ५४९३ नवे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत राज्यात ८६,५७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७०,६०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
The total number of samples tested up to 28 June is 83,98,362 of which 1,70,560 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/uWiMUF22cL
— ANI (@ANI) June 29, 2020
सध्याच्या घडीला महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि दिल्लीत सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौराही केला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी, रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाऊ नका, पण मृत्यूदर नियंत्रणात ठेवा, असे डॉक्टरांना सांगितले होते.