Bank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या

Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.

Updated: Nov 25, 2022, 03:25 PM IST
Bank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या title=

Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. या महिन्यात एकूण 13 बँक सुट्ट्या (Bank Holiday) असणार आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे दिवस टाळून इतर दिवशी बँकेशी निगडीत महत्त्वाची काम उरकून घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात ख्रिसमससह इतर सुट्ट्या येत आहेत. 13 दिवसांमध्ये शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइनमध्ये बँकेशी निगडीत सार्वजनिक सुट्ट्यांबाबत सांगण्यात आलं आहे. मात्र या सुट्ट्या त्या त्या राज्यातील महत्त्वाच्या दिवसांवर आधारित असतात. डिसेंबर महिन्यातील पहिली सुट्टी 3 तारखेला असणार आहे. 

कधी कोणत्या राज्यात सुट्टी असेल जाणून घ्या

3 डिसेंबरनंतर 4 डिसेंबरला रविवारची सुट्टी आहे. 10 आणि 11 डिसेंबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँक दोन दिवस बंद राहणार आहे. यानंतर 12 डिसेंबरलाही देशातील काही भागात बँका बंद राहतील. 18 डिसेंबर रविवार आणि 19 हा गोवा मुक्ती दिन आहे. 24, 25 आणि 26 डिसेंबर ही ख्रिसमससाठी प्रदेश-विशिष्ट सुट्टी आहे. यानंतर 29, 30 आणि 31 डिसेंबरला सलग तीन दिवस बँका बंद राहतील. 29 तारखेला गुरु गोविंद सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त, 30 तारखेला यू कियांग नांगबा आणि 31 तारखेला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील.

बातमी वाचा- American Diplomats: अमेरिकन डिप्लोमॅट ऑफिसला रिक्षानं का जातात? कारण ऐकून थक्क व्हाल

  • 3 डिसेंबर (शनिवार), सेंट फ्रान्सिस झेव्हियर, पणजी गोवा
  • 4 डिसेंबर (रविवार), साप्ताहिक सुट्टी, देशभर
  • 10 डिसेंबर (शनिवार), महिन्याचा दुसरा शनिवार, देशभर
  • 11 डिसेंबर (रविवार), साप्ताहिक सुट्टी, देभभर
  • 12 डिसेंबर (सोमवार), पा-तोगन नेंगमिंजा संगमा, शिलांग
  • 18 डिसेंबर (रविवार), साप्ताहिक सुट्टी, देभभर
  • 19 डिसेंबर (सोमवार), गोवा लिब्रेशन डे, पणजी गोवा
  • 24 डिसेंबर (शनिवार), महिन्याचा चौथा शनिवार, देशभर
  • 25 डिसेंबर (रविवार), साप्ताहिक सुट्टी आणि ख्रिसमस, देभभर
  • 26 डिसेंबर (सोमवार), लोसूंग/नामसूंग, एजावल (शिलांग)
  • 29 डिसेंबर (गुरुवार), गुरु गोविंद सिंग जयंती, चंदीगड
  • 30 डिसेंबर (शुक्रवार), यू कियांग नांगबाह, शिलांग
  • 31 डिसेंबर (शनिवार), न्यू ईयर ईव्ह, देशातील काही भागात