अमृतसर : देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. दिवसागणिक कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. कोरोनामुळे आता प्रत्येक राज्य आपल्या आपल्या परिनं कठोर निर्बंध उचलत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी येत आहे. एअर इंडियाच्या विमानातून आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
एअर इंडियाच्या विमानातून पंजाबच्या अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. 182 लोक विमानातून प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 120 हून अधिक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे विमान इटलीहून आले होते.
हे प्रवासी कुठल्या परिसरातील आहेत याची माहिती अजून समोर आली नाही. सर्व कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे. या 5 राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र 26,538 नवीन कोरोना रुग्ण, पश्चिम बंगाल 14,022 रुग्ण, दिल्ली 10,665 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.