नवी दिल्ली : बिहारच्या बगहामध्ये एका 12 वर्षाच्या मुलाने हजारो लोकांचे वाचवले प्राण.
बिहारमधील रेल्वे ट्रक तुटल्याचं या चिमुकल्याला कळताच त्याने धावत सर्व माहिती गँगमनला दिली. त्यानंतर ट्रॅकवर येणार पॅसेंजर ट्रेन 55072 गोरखपुर - नरकटियागंज या पॅसेंजरला थांबवलं. आणि अपघात होता होता बचावला. याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी हा अपघात होता होता वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, अवसानी हॉल्ट जवळ 12 वर्षाचा भीम जात होता. तेव्हा त्याचं लक्ष रेल्वे ट्रकवर गेली. आणि त्यावेळी पहिला विचार त्याने केला की मी रेल्वे थांबवेन मात्र त्याकडे तेवढा वेळ नव्हता. तो धावत गँगमॅनजवळ गेला आणि सगळा प्रकार सांगितला. तेव्हा तात्काळ येणारी पँसेजर थांबवण्यात आली. आणि हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले.
त्यानंतर भीमने सांगितले की, तो अनेक वर्षापूर्वी सुखपुरवा या गावी आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. तेव्हा असाच एका मुलाने अपघात टाळला होता आणि त्याची भरपूर चर्चा झाली होती. त्यावेळी त्याने देखील असा निश्चय केला होता की तो देखील असंच काहीस काम करेल. आणि तसं काम त्याच्याहातून झालं. त्याच्या प्रसंगावधानामुळे हजारोंचे प्राण वाचले.