नवी दिल्ली : ५००, १००० रुपयांच्या नव्या नोटा आणल्यानंतर आता सरकार १०० रुपयांची नवी नोट आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत १०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु होऊ शकते.
मीडिया रिपोर्टनुसार भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी एप्रिलमध्ये १०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु करु शकते. हे काम २०० रुपयांच्या नव्या नोटा छापल्यानंतर सुरु होईल.
रिपोर्टमधील माहितीनुसार, १०० रुपयांच्या नव्या नोटांचे डिझाईन नव्या सीरिजमधील इतर नोटांप्रमाणेच असणार आहे. दरम्यान, नव्या नोटा आल्यानंतरही जुन्या १०० रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत.
खरतर जगातील अनेक देशांमधील सरकार वेळोवेळी नोटांचे डिझाईन बदलत असते. ज्यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण राखण्यास मदत होते.