मोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार

Education News : शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. शासनानं बदलता काळ आणि जागतिक स्तरावरील प्रगती पाहता हे बदल केले.   

सायली पाटील | Updated: Nov 23, 2023, 11:52 AM IST
मोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार title=
10 plus 2 exams can now become doctors without biology education news

Education News : शैक्षणिक कारकिर्दीत नेमकं कोणत्या वळणावर जायचं, मोठं होऊन काय व्हायचं? कोणचं Profession निवडायचं याचा विचार हल्लीची पिढी फार आधीच करताना दिसते. दोन दशकांपूर्वी हे चित्र वेगळं होतं. पण, काळ पुढं आला, अनेक पर्याय तयार झाले आणि याच पर्यायांच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठीच्या एक नव्हे, असंख्य वाटांची मदत अनेकांनाच झाली. 

स्वप्नपूर्तीच्या दिशेनं अर्थात करिअरच्या (career) वाटेवर निघालेल्या अनेकांच स्वप्न असतं, ते म्हणजे डॉक्टर होण्याचं. जनसेवा, रुग्णसेवा, गरजूंना योग्य वेळी योग्य मदत पोहोचवणं, अनेर आजारांविषयी सर्वसामान्यांना जागृत करणं या आणि अशा अनेक कारणांनी बरेचजण वैद्यकिय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा पर्याय निवडतात. काहींना डॉक्टर व्हायचं असतं, पण इथं अडथळा येतो तो म्हणजे विविध शाखांमध्ये सुरुवातीचं महाविद्यालयीन शिक्षण झाल्याचा. 

बायोलॉजी नसणारेही डॉक्टर होणार... 

आता एक मोठा अडथळा वाटेतून दूर होणार असून, डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्यांना त्यांचं स्वप्न साकारण्याची संधी मिळणार आहे. कारण, 10+2 अर्थात बारावीची (HSC Exams) परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांनाही डॉक्टर होता येणार आहे. 

अट फक्त एकच, वैद्यकिय शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी additional subject म्हणून बारावीच्या परीक्षेमध्ये biology/biotechnology मध्ये उत्तीर्ण असावं. राष्ट्रीय वैद्यकिय आयोगानं याबाबतच्या मार्गदर्शक सुचना नुकत्याच जारी केल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा : गावाकडे निघणाऱ्या प्रवाशांसाठी Indian Railway ठरली तारणहार, कशी ते पाहा 

NMC च्या माहितीनुसार physics, chemistry, biology/biotechnology आणि इंग्रजी (additional subject) विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठीची NEET-UG परीक्षा देता येणार आहे. इतकंच नव्हे, तर या विद्यार्थ्यांना एनएमसीकडून देण्यात येणारा कायदेशीर पुरावा म्हणून पात्रता प्रमाणपत्रही देण्यात येणआर आहे. ज्यामुळं त्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षणही घेता येणार आहे. 

डॉक्टर होण्यासाठी यापूर्वी विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षांसाठी म्हणजेच अकरावी आणि बारावीमध्ये physics, chemistry, biology/biotechnology या विषयांचा सातत्यपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित होतं. त्यासोबतच एमबीबीएस आणि बीडीएससाठी इंग्रजीसुद्धा महत्त्वाचा विषय होता. पण, आता मात्र वैद्यकिय क्षेत्रातील या नव्या निर्णयामुळं अनेकांसाठीच खऱ्या अर्थानं करिअरच्या नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.