कुत्र्याची जबरदस्त सटकली आणि माणसाचा घोटला गळा

 तुमच्याकडे किंवा तुमच्या सोसायटीत कुणाकडे कुत्रा आहे का? असेल तर तो कुठल्या जातीचा आहे ते नक्की तपासून पाहा.  

Updated: Jan 16, 2021, 09:50 PM IST
कुत्र्याची जबरदस्त सटकली आणि माणसाचा घोटला गळा  title=

चेन्नई : तुमच्याकडे किंवा तुमच्या सोसायटीत कुणाकडे कुत्रा आहे का? असेल तर तो कुठल्या जातीचा आहे ते नक्की तपासून पाहा. आम्ही असं तुम्हाला आवर्जून सांगतोय. कारण तामिळनाडूत जे घडलं. ते सगळ्यांची झोप उडवणारं आहे. (dog attack in Tamil Nadu)

तुम्ही कुत्रा घ्यायचा विचार करत आहात का, तर आधी ही बातमी वाचा. काळाकुट्ट रंग. डोळ्यांत खुन्नस आणि तोंडावर समोरच्याला खाऊ की गिळू, असे एक्सप्रेशन्स. हाच रॉटविलर. प्रचंड आक्रमक आणि प्रचंड सणकी. याचं कधीही सटकू शकतं. अशाच एका तामिळनाडूतल्या रॉटवेलरची सटकली आणि त्यानं चक्क माणसाचा गळा घोटला. (dog attack in Tamil Nadu)

ही घटना आहे कुड्डारोल जिल्ह्यातल्या एका शेतातली. काँग्रेस कार्यकर्ता एन विजयसुंदरम नावाच्या एका माणसानं तीन वर्षांपूर्वी दोन रॉटवेलर कुत्रे आणले. हेच कुत्रे  शेताची राखण करायचे. जीवनाथम नावाचा नोकर रोज या कुत्र्यांना जेवण द्यायचा. सगळं व्यवस्थित सुरू होतं. 

पण मंगळवारी भलतंच घडलं. जीवनाथमला या कुतऱ्यांना जेवण द्यायला उशीर झाला आणि या कुत्र्यांची एवढी सटकली की त्यांनी जीवनाथम दिसताच त्याच्यावर जोरदार झडप घालती. त्याला बोचकारले. त्याचे कान फाडले. कुत्र्यांच्या तावडीतून सुटून जीवनाथमने पळण्याचा प्रयत्न केला. पण दोघा कुत्र्यांनी पुन्हा त्याला पकडलं, कुत्र्यांचा हा हल्ला एवढा जबरदस्त होता. की जीवनाथमचा पुढच्या काही मिनिटांत शेतातच मृत्यू झाला.

रॉटवेलर कुत्रे प्रचंड भडकू आणि डेंजर असतात. स्पेन, इटली, फ्रांस, पोर्तगाल, रोमानिया, यूक्रेन, रशिया, इजरायलंसारख्या अनेक देशांमध्ये या कुत्र्यांवर बंदी आहे. या रॉटवेलर्सनी तामिळनाडूत जे केलं, ते झोप उडवणारं आहे. कुत्रा पाळायचा असेल तर रॉटवेलरपासून लांबच राहा आणि तुमच्या आसपासच्या भागातही कुणाकडे रॉटवेलर नाही ना, यावरही लक्ष ठेवा.