उंची वाढवण्यासाठी उपयुक्त अशी '४' योगासने!

लहानपणी उंची वाढवण्यासाठी आपण दोरीच्या उड्या मारणे, सायकल चालवणे, रॉडला लटकणे असे अनेक प्रकार करतो. 

Updated: Jun 21, 2018, 08:02 AM IST
उंची वाढवण्यासाठी उपयुक्त अशी '४' योगासने! title=

मुंबई : लहानपणी उंची वाढवण्यासाठी आपण दोरीच्या उड्या मारणे, सायकल चालवणे, रॉडला लटकणे असे अनेक प्रकार करतो. तुम्हीही यापैकी काहीतरी नक्कीच केले असेल. योगसाधनेमुळे उंची वाढविण्यास नक्कीच मदत होईल. पण एका ठराविक वयापर्यंतच. एकदा तुमच्या हाडांची वाढ होणे थांबल्यावर मात्र उंची वाढण्यासाठी फार काही फायदा होणार नाही.

जसजसे तुमचे वय वाढते तसतसा तुमचा पाठीचा कणा आकुंचित व्हायला लागतो. त्यामुळे उंची वाढत नाही. योगासनांमुळे तुमच्या पाठीच्या कण्याचे आणि पाठीचे स्नायू मजबूत व्हायला लागतात. योगसाधना नियमित केल्यास खांदे, हीप्स आणि पेल्विक जॉन्ट्स मजबूत व लवचिक होण्यास मदत होते. या काही आसनांमुळे एका ठरविक वयात उंची वाढवण्यास नक्कीच मदत होईल.

तुमची उंची कशावर अवलंबून असते?

आपले जिन्स आणि इतर जैविक व पर्यावरणीय घटकांवर उंचीचे प्रमाण अवलंबून असते. सामान्यपणे तुमच्या हाडांची वाढ एका ठराविक वेळेपर्यंत होते व नंतर ती थांबते. मुलींची उंची वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजेच प्युबर्टीच्या काळात मंदावते. तर मुलांची उंची वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत झपाट्याने होते. तुमच्या आई-वडीलांकडून मिळालेल्या जीन्स वर तुम्ही उंची अवलंबून असते. ज्या लहान मुलांना लहानपणी विविध आजार झाले असतील त्यांची उंची कमी वाढते. ग्रोथ हार्मोन्सची निर्मिती काही ठराविक परिस्थितीत कमी होते. त्याचा परिणाम उंचीच्या वाढीवर होतो.

उंची वाढीसाठी उपयुक्त अशी काही आसने:

भुजंगासन:

भुजंगासनात छातीचे स्नायू, खांदे आणि पोटाचा भाग स्ट्रेच होतो. तसंच पाठीचा स्टिफनेस कमी होऊन पाठवण्याचे आरोग्य सुधारते.

ताडासन:

उंची वाढवण्यासाठी हे अतिशय उत्तम आसन आहे. यात हाताची देखील हालचाल होते. छातीजवळचा भाग टोन होतो आणि फुफ्फुसांना स्ट्रेच मिळतो. पाठीचे दुखणे असणाऱ्यांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर ठरते.

नटराजासन:

पाय, पोटऱ्या, हात, मनगट यांच्या स्नायूंना बळकटी देण्याबरोबरच या आसनात फुफ्फुसं आणि छातीला देखील स्ट्रेच मिळतो. तसंच त्याचा फायदा मांड्या आणि हीप्सच्या स्नायूंना ही होतो. गुडघा किंवा घोटा दुखावला गेला असल्यास हे आसन करणे टाळा. कारण त्यामुळे त्यावर अधिक ताण येऊ शकतो.

सूर्यनमस्कार:

सूर्यनमस्कारांमध्ये असलेल्या १२ आसनांमुळे पाठकण्याला आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच मिळतो. मागे आणि पुढे झुकणारी आसने केल्यामुळे पाठकण्याला मसाज मिळतो. त्याचबरोबर शरीराच्या आतील अवयवांना स्ट्रेच मिळाल्यामुळे त्यांचे कार्य सुरळीत होते.