World Thalassemia Day 2023: तुमच्या शरीरात रक्त कमी आहे, लक्षणे दिसताच सुरु करा 'हे' उपाय

World Thalassemia Day:  जेव्हा जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवते. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन ही कमी होऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि या गंभीर आजाराला दुर्लक्ष करण्याची चूक करु नका. 

| Updated: May 8, 2023, 09:12 AM IST
World Thalassemia Day 2023: तुमच्या शरीरात रक्त कमी आहे, लक्षणे दिसताच सुरु करा 'हे' उपाय title=
World Thalassemia Day 2023

World Thalassemia Day 2023 in Marathi : आपल्या शरीरात रक्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही आजाराचे निदान प्रामुख्याने रक्ताच्या नमुन्यांद्वारे केले जाते. मानवी शरीरात रक्त गोठण्याची एक विशिष्ट मर्यादा असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील रक्तदाब कमी झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकदा थकवा, अशक्तपणा आणि चक्कर यासारख्या समस्या जाणवता. असा एक आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला वारंवार रक्त चढवावे लागते. तुम्हाला जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा... नेमका असा कोणता आजार आहे? ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते...(World Thalassemia Day 2023)

ब्लड कॅन्सर, हिमोफिलियाप्रमाणेच थॅलेसेमिया (Thalassemia) हा एक अतिशय गंभीर आजार आहे. हाच तो आजार ज्यामध्ये रुग्णाला वारंवार रक्त चढवावे लागते. थॅलेसेमिया हा रक्ताचा विकार आहे, जो असामान्य हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीमुळे होतो. हिमोग्लोबिन तुमच्या लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अॅनिमिया (Anemia) होऊ शकतो. दरम्यान जागतिक थॅलेसेमिया दिन दरवर्षी 8 मे ला (World Thalassemia Day 2023) जगभरात साजरा केला जातो. या आजाराची नेमकी लक्षणे कोणती आणि त्यावर कोणते उपाय केले पाहिजे जाणून घेऊया...  

थॅलेसेमिया म्हणजे काय? (What is Thalassemia?)

थॅलेसेमिया हा रक्ताचा विकार म्हणजेच रक्ताशी संबंधित आजार आहे. हा आजार आनुवंशिक असून यामध्ये शरीरात पुरेसे रक्त तयार करण्याची क्षमता कमी होते. जेव्हा पुरेसे हिमोग्लोबिन नसते तेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा लाल रक्तपेशी शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन पुरवू शकत नाही तेव्हा इतर आजारांना सामारे जावे लागते. थॅलेसेमिया असलेल्या लोकांमध्ये एकतर हिमोग्लोबिन तयार होत नाही किंवा ते फारच कमी बनतात. हे प्रामुख्याने भूमध्य, दक्षिण आशियाई, दक्षिण पूर्व आशियाई आणि मध्य पूर्व देशांतील लोकांना प्रभावित करते. 

या आजाराची लक्षणे (Symptoms of Thalassemia)

थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार आहे. जर मुलाच्या पालकांपैकी फक्त एकालाच थॅलेसेमिया असेल तर तुमच्या मुलालाही हा आजार होऊ शकतो. जरी पालकांमध्ये हा आजार सौम्य असला तरी, तरी तुमच्या मुलाला हा आजार होण्याची शक्यता असते. जेव्हा पुरेशा लाल रक्तपेशी नसतात, शरीराच्या इतर सर्व पेशींमध्ये पुरेसा ऑक्सिजन पोहोचू शकत नाही, ज्यामुळे आजारी, थकवा, अशक्त, फिकट त्वचा, चेहऱ्याच्या हाडांच्या समस्या, ओटीपोटात सूज येणे, युरीनचा रंग गडद पिवळा होणे, याशिवाय या आजाराचे रुग्ण नेहमी अॅनिमियाचे बळी राहतात.

या आजारावर काळजी कशी घ्यावी? (How to take care of thalassemia )

थॅलेसेमिया असलेल्या लोकांना सौम्य किंवा गंभीर अशक्तपणा असू शकतो. म्हणूनच पालकांची जबाबदारी आहे की, त्यांना हा आजार झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांचा जन्म होताच सहा महिन्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तसेच शरीरातील कमी रक्तदाबामुळे अनेक लोक तुम्हाला लोह घेण्याचा सल्ला देतात. परंतु रुग्णांनी ते पूर्णपणे टाळावे. जर एखाद्या व्यक्तीला थॅलेसेमिया झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या आहाराचा मेनू ठरवा. याशिवाय अशा लोकांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्याच वेळी, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारचा सल्ला घेऊ नका.