महिन्यातून एक नाही तर एवढ्या वेळेस पिरीयड्स येऊ शकतात का? जाणून घ्या

किशोरावस्थेतील मुलींमध्ये या चक्रात बदल होऊ शकतात.

Updated: Jun 18, 2021, 03:10 PM IST
महिन्यातून एक नाही तर एवढ्या वेळेस पिरीयड्स येऊ शकतात का? जाणून घ्या title=

मुंबई : मासिक पाळीची सायकल ही 24 ते 38 दिवसांची असते. किशोरावस्थेतील मुलींमध्ये या चक्रात बदल होऊ शकतात. काही महिलांना एखाद्या महिन्यात पिरीयड्स लवकर येतात तर काहींच्या प्रकरणात उशीरा येण्याचीही शक्यता असते. मात्र काही कारणांमुळे किंवा समस्यांमुळे मासिक पाळी अधिकच लवकर येऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या कारणांनी महिन्यामध्ये दोन वेळा पिरीयड्स येऊ शकतात.

पेल्विक इंफ्लामेटरी डिसीज

महिलांमध्ये पेल्विक इंफ्लामेटरी डिसीजमुळे असामान्य वजायनल ब्लिडींग होऊ शकतं. कारण या समस्येत तयार होणारे बॅक्टेरिया योनीमार्ग सर्विक्समध्ये पोहोचतात. यामुळे महिलांना महिन्यातून दोन वेळा पिरीयड्स येऊ शकतात.

गर्भाशयातील फायब्रॉईड

जेव्हा गर्भाशयाच्या आतील बाजून कॅन्सर नसलेला ट्यूमर तयार होतो तेव्हा त्याला फायब्रॉईड असं म्हणतात. ही समस्या त्या महिलांना उद्भवते ज्यांचं गर्भधारणेचं वय असतं. या ट्यूमरमुळे योनीमार्गातून रक्तस्राव होऊ शकतो. 

गर्भनिरोधक गोळ्याचं सेवन

ज्या महिला नियमित स्वरूपात गर्भनिरोधक गोळ्याचं सेवन करतात त्यांनी ही औषधं घेण्याचं सोडल्यानंतर त्यांना असामान्य पिरीयड्स सुरु होऊ शकतात. तर काही गर्भनिरोधक गोळ्यांनी शरीरात हार्मोनल चेंजेस होतात. ज्यामुळेही रक्तस्राव होऊ शकतो.

गर्भधारणेमुळे होतो रक्तस्राव

गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना रक्तस्राव होऊ शकतो. याला इंप्लांटेशन ब्लीडिंग असं म्हटलं जातं. यामध्ये महिलांना ब्लड स्पॉटिंग किंवा मध्यम स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक संबंधांनंतर महिन्यातून दोन वेळा पिरीयड्स आल्यास प्रेग्नेंसी टेस्ट करून घ्यावी.