Health Tips : महिलांनो लठ्ठपणाला हलक्यात घेऊ नका, नाहीतर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

How to Gain Weight : आजच्या काळात लठ्ठपणा हा सर्वात जास्त वाढणारा आजार आहे. हा रोग कोणत्याही वयोगटात दिसून येतो. मात्र अतिलठ्ठपणा ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामागचं नेमके कारण काय आहे ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 16, 2023, 04:28 PM IST
Health Tips : महिलांनो लठ्ठपणाला हलक्यात घेऊ नका, नाहीतर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार title=
How to Gain Weight

How to Gain Weight News In Marathi:  सध्या दैनंदिन जीवनात एक समस्या प्रामुख्याने दिसून येते, ती म्हणजे लठ्ठपणा ( symptoms in women). किती प्रयत्न केला तरी वाढते वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होत नाही. लठ्ठपणाचे आरोग्यावर परिणाम सुद्धा होतात. यामुळे अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो. लठ्ठणामुळे रक्तदाबावर परिणाम, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे (increase cholesterol), ह्रदयरोग, पित्ताशयात खडे किंवा मधुमेह होऊ शकतो. तसेच अनुवांशिक कारणामुळे ही लठ्ठपणा होऊ शकतो. मात्र ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.

अनेकदा महिला वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. हे सगळं करूनही महिलांना फारसा फरक जाणवत नाही. बहुतेक वेळा कमी वयात महिलांचे शरीर सुटू लागते आणि शरीराचा आकार अगदी विचित्र होऊन जाते. अशावेशी अनेक महिला वेगवेगळे योगासने, व्यायाम करतात, पण तरीही त्यांना काही परिणाम जाणवत नाही. नेमकी या आजाराची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया...

महिलांच्या शरीरात लठ्ठपणा वाढण्याची कारणे कोणती?

महिलांच्या (women) शरीरातील लठ्ठपणा वाढण्याची कारणे अनेकदा अनुवंशिक असतात. जर तुमचे आई-वडील शरीराने धष्टपुष्ट असतील तर अशा वेळी जन्माला येणारी मुले सुद्धा शरीराने लठ्ठ असतात. बहुतेक वेळा, योग्य व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळेचे योग्य पालन न करणे, केव्हाही काही अन्न खाणे, आणि हे तसेच शरीरावर ताण निर्माण होतो आणि परिणामी पचनसंस्था नीट काम करत नाही. अनेकदा काही आजार असे असतात की त्या आजारांमध्येही वजन वाढण्याची शक्यता असते, जसे की थायरॉईड, पीसीओडी, पीसीओएस, जर स्त्री काही हार्मोनल उपचार घेत असेल तर अशा केसेसमध्ये अतिरिक्त पुराव्याने वजन वाढते.

महिलांना कोणते आजार होऊ शकतात?

जास्त वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्यामध्ये गॅप येणे, हाडांचे विविध आजार, हृदयविकाराचा झटका, व्हेरिकोज व्हेन्स, वंध्यत्व, पीसीओडी, त्वचेचे बुरशीजन्य संसर्ग, स्ट्रेच मार्क दिसणे, असे विविध प्रकारचे आजार भविष्यात होण्याची शक्यता असते, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमच्या शरीरातील दिवसेंदिवस वाढत जाणारा लठ्ठपणा नियंत्रित केला नाही तर एका महिलेलाही 13 प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. 

लठ्ठपणाची अनेक कारणे

  1. शरीरातील ऊर्जेचे निर्मिती किंवा तिचा वापर यांच्यात तीव्र असंतुलनामुळे लठ्ठपणा येतो.
  2. आहारातून जास्त चरबीचे सेवन केल्यानेही लठ्ठपणा येतो.
  3. व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली ही प्रमुख कारणे आहेत.

लठ्ठपणा कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की तळलेले पदार्थ कमी खाणे, भाज्या आणि फळे जास्त खाणे, नियमित व्यायाम आणि योगासने करणे, साखरयुक्त पदार्थ न वापरणे, संपूर्ण धान्य आणि दळलेली तृणधान्ये खाणे. लठ्ठपणा हा आजार बरा होऊ शकतो, यासाठी आपल्याला आपली जीवनशैली योग्य अशी बदलण्याची गरज आहे.
 
 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)