मुंबई : सध्याच्या काळात बाळाचा विचार हा महिला लग्न झाल्यानंतर थोड्या वर्षांनी करतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका स्डटीनुसार, सुशिक्षित महिलांमध्ये लग्नापूर्वी मूल हवं असणाची इच्छा वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या विचारात हा बदल जाणवला असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.
या अभ्यासात नमूद केल्याप्रमाणे, सुशिक्षित महिलांना आता लग्नापूर्वी मूल हवं असल्याची इच्छा दिसून येते. अशा महिलांची संख्या वाढली आहे.
अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, सुशिक्षित महिलांमध्ये ऐतिहासिक बदल दिसून येत आहे. 90च्या दशकात हा बदल इतक्या प्रमाणात दिसून आला नाही. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ अँड्र्यू शर्लिन यांनी सांगितलं की, पदवी असलेल्या महिलांना त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या आधी किंवा लगेच लग्न करायचं असतं. तर त्यांना लग्नापूर्वी पहिलं मूल हवं असतं.
अँड्र्यू सांगतात की, लग्नानंतर मुलांबाबतची इच्छा कमी होतेय. सुशिक्षित स्त्रिया आधी मुलांना जन्म देतात आणि नंतर लग्न करतात. प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अँड्र्यू शर्लिन यांनी सांगितलम की, 18 ते 27 टक्के महाविद्यालयीन वयाच्या स्त्रिया त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अविवाहित आहेत.
अभ्यासात असं समोर आलं आहे की, महिलांचा विकास झाला आहे. त्याचबरोबर त्यांचं पहिलं मूल होण्याची इच्छाही वाढत आहे.
अभ्यासानुसार, 1996 मध्ये, महाविद्यालयीन शिकणाऱ्या 30 वयोगटातील महिलांपैकी 4 टक्के महिलांनी त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी लग्न केलं नव्हतं. 20 वर्षांनंतर अशा महिलांची संख्या 6 पटीने वाढली आहे. आता ते 24.5%आहे. कॉलेजमध्ये शिकलेल्या, ज्याने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला, त्यांच्या 30च्या सर्व स्त्रिया त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या आधी किंवा नंतर लगेच लग्न करत आहेत.