मुंबई : कोणत्याही मुलीसाठी मासिकपाळी येणं सुरु होणं, हे तिच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. परंतु मासिकपाळी येऊ लागल्यानंतर अनेक मुलींच्या मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहतात. ज्यासाठी तिची आईला किंवा मैत्रीणी तिला मदत करतात किंवा समजावून सांगतात. परंतु बऱ्याचदा योग्य माहिती न मिळाल्यामुळे अनेक मुलींना याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थीत राहातात, ज्यामुळे त्यांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्या गोष्टी करू नयेत.
मासिक पाळी दरम्यान अशी खबरदारी घ्या
अनेक वेळा महिला सॅनिटरी नॅपकिन्स बदलण्यासाठी कंटाळा करतात, पण वारंवार रक्तस्त्राव होत असल्याने पॅडमध्ये जास्त रक्त साचते आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे इन्फेक्शन टाळायचे असेल तर योग्य वेळी नॅपकिन बदलत राहा.
अनेकदा मुली आपले वाढते वजन कमी करण्यासाठी डाएट करतात, पण पीरियड्सच्या काळात तुम्ही योग्य प्रमाणात आहार घ्या आणि पौष्टिक आहार घ्या, अन्यथा शरीरात अशक्तपणा येऊ शकतो.
ज्या स्त्रिया स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वर्कआउट करतात, त्यांनी मासिक पाळीच्या काळात असे करणे टाळावे, कारण यामुळे पाठदुखी तसेच, इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
बर्याच जणांना जंक फूड खायला आवडते, परंतु पीरियड्सच्या काळात महिलांनी ते अजिबात खाऊ नये, कारण यामुळे जास्त चिडचिड होते. अशावेळी महिलांना बाहेरचे आणि चमचमीत पदार्थ खायला आवडतात. परंतु असे करु नका, स्वत:ला असं करण्यापासून थांबवा, कारण हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.
जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते तेव्हा तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला केमिकलयुक्त साबणाने धुवू नका, त्यामुळे तेथील कोरडेपणा वाढू शकतो, तसेच खाज सुटू शकते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)