'या' बाबतीत महिला पुरूषांपेक्षा अधिक सक्षम!

सर्व प्रकारचे व्यायाम करण्यास पुरूष हे महिलांपेक्षा अधिक फिट असतात.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 6, 2017, 05:02 PM IST
'या' बाबतीत महिला पुरूषांपेक्षा अधिक सक्षम! title=

नवी दिल्ली : सर्व प्रकारचे व्यायाम करण्यास पुरूष हे महिलांपेक्षा अधिक फिट असतात. आपल्या या धारणेला छेद देणारे एक संशोधन समोर आले आहे. यात असे सिद्ध झाले आहे की, महिलांमध्ये एरोबिक व्यायाम करताना ऑक्सिजन प्रोसेस करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे त्या कणखर असतात.

ही क्षमता अधिक

त्याचबरोबर ऑक्सिजन प्रोसेस करण्याच्या अधिक क्षमतेमुळे महिलांच्या शरीर पेशींना एरोबिक व्यायाम करताना कमी तणाव सहन करावा लागतो. ज्यात कार्डियो, स्पिनिंग, धावणे. चालणे, पोहणे. फिरणे या व्यायामप्रकारांचा समावेश आहे. ज्यात ऊर्जेच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन घेण्याची आवश्यकता असते.

धारणेला छेद देणारे संशोधन

या संशोधनाचे मुख्य आणि कॅनडाचे वाटरलू विश्वविद्यालयाचे प्रोफेसर थॉमस बेल्ट्रेम यांनी सांगितले की, हा निष्कर्ष सर्वसामान्य धारणेला छेद देणारे आहे. याच विश्वविद्यालयाचे संशोधक रिचर्ड ह्यूगसन यांनी सांगितले की, महिलांच्या पेशी ऑक्सिजन ग्रहण करण्यास अधिक सक्षम असतात. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर एरोबिक व्यायामासाठी हे अधिक चांगले असल्याचे लक्षण आहे. 

हा शोध एप्लाइड साइकोलॉजी, न्यूट्रिशन अॅण्ड  मेटबॉलिज्म नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. व्यायाम करताना महिलांच्या शरीरात पुरूषांपेक्षा ३०% अधिक जलद गतीने ऑक्सिजनचे शोषण होते.