मुंबई : मासिक पाळी वेळवर न येणं, शरीरावर अतिरिक्त केसांची वाढ तसंच वजनात वाढ अशा समस्या घेऊन महिला डॉक्टरांकडे गेल्या की त्यांना PCOD म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज याचं निदान करण्यात येतं. सध्या जीवनशैलीतील बदलामुळे महिलांमध्ये PCODचा त्रास महिलांना उद्भवतो.
पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ही एक हार्मोनल समस्या आहे जी 12-45 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येते. जेव्हा हार्मोन्समध्ये असंतुलन होतं तेव्हा PCOD ची समस्या पुढे येते. या आरोग्य स्थितीमध्ये अंडाशयाचा आकार खूप मोठा होतो आणि त्यात सिस्ट तयार होऊ लागतात.
पीसीओडीच्या लक्षणांमध्ये मासिक पाळी नियमित न होणं, शरीरातील केसांची जास्त वाढ, केस गळणं, पुरळ आणि वजन वाढणे यांचा समावेश होतो. डॉ. अर्चना निरुला म्हणतात की, PCOD मुळे गरोदरपणात खूप त्रास होतो कारण त्यात स्त्रीचं ओवेल्यूशन होत नाही. त्यामुळे स्त्रिया गर्भधारणा होत नाही. पीसीओडीची लक्षणं ओळखून योग्य वेळी उपचार करणं फायद्याचं असतं.
स्त्रीचं अंडाशय फीमेल सेक्स हॉर्मोन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन तयार करतं. अंडाशय काही प्रमाणात मेल सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन तयार करतात. परंतु जेव्हा एखाद्या महिलेला PCOD असतो तेव्हा अंडाशय इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनऐवजी इतर मेल हार्मोन एंड्रोजन तयार करण्यास सुरवात करतात. याला हायपरअँड्रोजेनिझम म्हणतात.
एंड्रोजेनच्या निर्मितीमुळे ओवेल्युशन होत नाही आणि मासिक पाळी देखील असामान्य होते. पीसीओडी ही एक अनुवांशिक समस्या आहे. PCOD ची समस्या 50% मुलींमध्ये दिसून येते ज्यांच्या आई किंवा बहिणीला ही समस्या असते.
PCOD साठी आयुर्वेदात 100% नैसर्गिक उपचार आहेत. स्त्रीच्या अंडाशयाचा आकार आणि स्थिती यावर आधारित, आयुर्वेदिक डॉक्टर उपचार लिहून देतात, ज्यास 3-6 महिने लागू शकतात.
उपचारादरम्यान आयुर्वेदिक डॉक्टर व्यक्तीच्या 'प्रकृती'वर भर देतात आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडतात. गांधारी आणि वरुण यांसारख्या अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती दिल्याने सिस्ट हळूहळू नाहीशा होतात. कचनार गुग्गुलू नावाची आयुर्वेदिक गोळी देखील PCOD मध्ये दिली जाते. लक्षणं पाहून डॉक्टर राजपार्वतनी वटी आणि चंद्रप्रभा वटी या गोळ्या देखील देऊ शकतात.
जर तुम्हालाही PCOD असेल, तर स्वतःहून किंवा गुगलवर बघून कोणतेही आयुर्वेदिक औषध घेऊ नका. कारण ही हार्मोनल समस्या आहे, स्वतःहून घेतलेली औषधं हानिकारक ठरू शकतात.