मुंबई : पहिलं अंड की पहिली कोंबडी? हा प्रश्न फार आधीपासून साऱ्यांना पडलाय. याच उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. मात्र अंड्याबाबत आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे बाहेरुन इतके कडक असलेले अंडे आतून इतके सॉफ्ट का असते. आतापर्यंत याचे उत्तर कोणाला सापडले नव्हते मात्र कॅनडाच्या शास्त्रज्ञांनी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय.
कॅनडाच्या मांट्रियलच्या मॅकग्रिल युनिर्व्हसिटीच्या नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अंड्याच्या आतील भागांचा अभ्यास करण्यात आलाय. यातील मॉलिक्युलार नॅनोसंरचना आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करण्यात आला. जेव्हा कोंबडी अंडे देते तेव्हा बाहेरील वातावणापासून बचाव करण्यासाठी बाहेरचे कवच कडक असते. यामुळे आतील पिल्लाला सुरक्षा मिळते. मात्र जसजसा अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यास सुरुवात होते तशी त्यांच्या हाडांना कॅल्शियमची गरज भासते. ही गरज कवचातून भागवली जाते. त्यामुळे अंड्याचे कवच कमकुवत होताता आणि पिल्ले आरामात कवचातून बाहेर येतात.
शास्त्रज्ञांच्या मते अॅटोमिक फोर्स मायक्रोस्कॉपी, इलेक्ट्रॉन आणि एक्स रे इमेजिंग पद्धतीने केलेल्या अभ्यासात असे समोर आलेय की इनक्युबेशनदरम्यान अंड्याच्या आतील भागातील नॅनोसंरचनेत होणऱ्या सूक्ष्म बदलांमुळे आतील आणी बाहेरील भागांमध्ये बदल होतो.
अंडे शाकाहारी की मांसाहारी हा वाद अद्याप सुरु आहे. शाकाहारी लोकांच्या मते अंडे हे मांसाहागरी आहे. कारण अंडे हे कोंबडीपासून मिळते. त्यामुळे ते नॉनव्हेज. मात्र दूधही गायी, म्हैस या प्राण्यांपासून मिळते. मग ते शाकाहारी कसे? याचमुळे अनेक शाकाहारी अंडे खातात. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मात्र जर तुम्ही अंड्याला मांसाहारी समजत असाल तर येथे स्पष्ट करावेसे वाटते की बाजारात मिळणारी अनेक अंडी अनफर्टिलाइज्ड असतात. याचाच अर्थ या अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ शकत नाहीत. त्यामुळे वैज्ञानिकांच्या मते अंडे हे शाकाहारी आहे.
अंड्यामध्ये तीन लेयर्स असतात. पहिले कवच. दुसरा सफेद भाग आणि तिसरा पिवळे बलक. अंड्यावर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार अंड्याच्या सफेद भागात प्रोटीन असते. अंड्यातील पांढऱ्या भागाप्रमाणेच त्यातील पिवळ्या भागातही प्रोटीनसह अधिक कोलेस्ट्रोल आणि फॅट असते. दरम्यान, अंडी कोंबडी आणि कोंबडी एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर दिली जातात. यात गॅमी सेल्स असतात. ज्यामुळे ते मांसाहारी बनते.
जेव्हा कोंबडी ६ महिन्यांची होते तेव्हा दर एक वा दीड दिवसांनी अंडे देते. मात्र अंडी देण्यासाठी ती कोंबड्याच्या संपर्कात आलीच पाहिजे हे गरजेचे नाही. या अंड्यांना अनफर्टिलाइज्ड अंडी असतात. याचाच अर्थ या अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ शकत नाहीत. त्यामुळे वैज्ञानिकांच्या मते अंडे हे शाकाहारी आहे.