प्रेग्नंसीमध्ये आबंट खाण्याची इच्छा का होते? जाणून घ्या या मागचं कारण

बहुतांश गरोदर स्त्रींना आबंट खाण्याची सर्वाधिक इच्छा होते. यासोबतच इतर खाण्यापिण्याच्या पदार्थांची लालसाही वाढते. 

Updated: Aug 26, 2022, 12:40 PM IST
प्रेग्नंसीमध्ये आबंट खाण्याची इच्छा का होते? जाणून घ्या या मागचं कारण title=

Pregnancy Tips: प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात 'आई' होणं हा आनंददायी क्षण असतो. आई होणार असं कळताच मन प्रफुल्लित होऊन जातं. गरोदर स्त्री येणाऱ्या बाळाच्या आयुष्यात रमून जातो. गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. याचा परिणाम स्त्रीच्या मन:स्थितीवर होतो. गरोदर काळात स्त्रीची अधिक काळजी घेतली जाते. नऊ महिन्याच्या कालावधीत तिच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात. या काळात बहुतांश गरोदर स्त्रींना आबंट खाण्याची सर्वाधिक इच्छा होते. यासोबतच इतर खाण्यापिण्याच्या पदार्थांची लालसाही वाढते. पण असं का होतं? यामागे काय कारण आहे की, अचानक गरोदर स्त्रीला आंबट पदार्थ खावेसे का वाटतात? जाणून घ्या.

गरोदर स्त्रीच्या शरीरात गरोदर अवस्थेत अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे तिला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी झाल्याने आबंट खाण्याची इच्छा होते. फक्त आंबटच नाही तर एका संशोधनानुसार 50 ते 90 टक्के महिलांना या काळात वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. या इच्छेसोबत त्यांच्या चव आणि वासावरही परिणाम होतो. अचानक त्यांना एखाद्या गोष्टीची अॅलर्जी वाटते, तर काही पदार्थाच्या वासाने मळमळ होते. या काळात कधी न आवडलेले पदार्थही खावेसे वाटतात. गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे असं होते.

आबंट खाण्याची इच्छा झाली असली तरी हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. कैरी, चिंच, आवळा, लिंबू असे सिट्रस असलेले पदार्थ खावेत. या आबंट फळांमधून विटामिन्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक मिळतात. असं असलं तरी हे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

गरोदर स्त्रीनं लोणचं खाताना विशेष काळजी घ्यावी,  कारण त्यात भरपूर मीठ आणि इतर मसाले असतात.  पण इतकं करूनही गरोदर स्त्रीला एखाद्या विशिष्ट पदार्थाबद्दलची इच्छा नियंत्रित करता येत नसेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.