वायू प्रदूषणाबाबत WHOने जाहीर केली नवी मार्गदर्शक तत्त्व

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत.

Updated: Sep 23, 2021, 03:26 PM IST
वायू प्रदूषणाबाबत WHOने जाहीर केली नवी मार्गदर्शक तत्त्व title=

दिल्ली : WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. यामध्ये हवेच्या प्रदूषणाबाबत नवीन स्तर जाहीर केले आहेत. 16 वर्षांनी हे WHO ने हवेतील गुणवत्तेबाबत नवे स्तर जाहीर करण्यात आले आहेत. 

प्रदूषणामुळे अनेक आजार उद्भवतात. परिणामी या उद्भवलेल्या आजारातून दरवर्षी जगभरातील तब्बल 70 लाख लोकांचा अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे.

वायू प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार, PM2.5 चे 25 मायक्रोग्राम हे सुरक्षित असल्याचं सुरुवातीला मानण्यात येत होतं. परंतु, आता जागतिक आरोग्य संघटनेने 15 मायक्रोग्रॅमच्यावर ते धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

प्रदूषणाचे नवीन स्तर पाहिले तर संपूर्ण भारत हा हवेच्या प्रदूषणाने ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. यामध्ये भारत हा एकटा असा देश नसून 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या अशा भागात राहते, ज्याचे 2005च्या प्रदूषण मानकांचं पालन केले जात नाही. भारतात प्रदूषणाची पातळी शिफारस केलेल्या पातळीपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचंही लक्षात आलं आहे.

भारतात दिल्लीसारख्या शहरात प्रदूषणाची पातळी गंभीर आहे. प्रदूषणाच्या नवीन स्तरानुसार PM 2.5 हे प्रदूषक हे दिल्लीसारख्या शहरात तब्बल 17 पट जास्त आहे. तर मुंबईत वायू प्रदूषण नव्या स्तरानुसार 9 पटीने जास्त आहे.